चौल भोवाळे श्री दत्त यात्रा रस्ता नुतनीकरणाचे भुमिपुजनाने कामास प्रारंभ

रेवदंडा-महेंद्र खैरे- पर्वतवासी श्री दत्त यात्रेचा चौल भोवाळे ते पायऱ्या पर्यंतचा रस्ता नुतनीकरणाचे भुमिपुजन कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले. यावेळी श्री दत्त यात्रेच्या पायऱ्यापासून नुतनीकरण कामास प्रारंभ सुध्दा करण्यात आला.
गेले दोन तिन वर्षे चौल भोवाळे श्री दत्त यात्रेच्या रस्ताची दयनीय अवस्थ्ाा होती, श्री दत्त यात्रेच्या निमित्ताने या रस्त्याची दुरावस्था भाविकांना त्रासदायक ठरत होती. अखेर चौल शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मागणीने जिल्हा परिषद सदस्य डाँ.सचिन राउळ यांच्या प्रयत्नाने आमदार महेंद्र दळवी यांचे माध्यमातून चौल भोवाळे श्री दत्त यात्रा रस्ता नुतनीकरणास निधी प्राप्त झाला.
नुकतेच जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ व चौल पंचायत समिती सदस्या अंकिता घरत यांचे प्रमुख उपस्थितीत चौल भोवाळे श्री दत्त यात्रा रस्ता नुतनीकरणाचे भुमिपुजन पार पडले, यावेळी महिला विधानसभा संघटिका तनुजा घरत, चौल पंचायत समिती गण प्रमुख प्रशांत शेणवईकर, चौल शिवसेना शाखा प्रमुख सिध्देश शेणवईकर,शिवसैनिक आशिष कंटक,निखिल राउत, जेष्ठ शिवसैनिक सुदेश राउळ, जयवंत नागवेकर, भुषण घरत, तसेच भोवाळे ग्रामस्थ शरद फुंडे, अभय फुंडे, सचिन नाईक, संतोष म्हात्रे, मधुकर फुंडे, आदिवासी समाज अध्यक्ष भगवान नाईक आदीची उपस्थिती होती.या प्रसंगी चौल पंचायत समिती गण सदस्या अंकिता राउत यांचे हस्ते पुजाअर्चा विधी करण्यात आली, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य डाँ.सचिन राउळ व उपस्थित यांचे हस्ते श्रीफळ वाढवून रस्ता नुतनीकरणाचे भुमिपुजन संपन्न झाले. या दिवशी श्री दत्त्ा मंदिराचे पायऱ्ऱ्यापासून रस्ता नुतनीकरणास प्रारंभ करण्यात आला.
चौल भोवाळे श्री दत्त यात्रा रस्ताचे नुतनीकरणास भुमिपुजनाने कामास प्रारंभ झाला आहे, अनेक वर्ष रखडलेला चौल भोवाळे श्री दत्त यात्रा रस्ताचे काम मार्गी लागत असल्याचा आनंद जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ यांनी व्यक्त केला


