काशिदमधील दिप घाटवळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

काशिदमधील दिप घाटवळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
रेवदंडा (प्रतिनिधी) – मुरूड तालुक्यातील काशिद येथील रहिवासी दिप घाटवळ यांनी दहावीच्या सीबीएससी बोर्ड परीक्षेत मिळविलेल्या उज्ज्वल यशाबद्दल सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
साळाव येथील जिंदाल विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी असलेल्या दिप घाटवळ यांनी दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे कुटुंबिय, शिक्षक तसेच परिसरातून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.
यावेळी काशिद येथील त्यांच्या निवासस्थानी उसरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनिष नांदगावकर यांनी सदिच्छा भेट देत दिप घाटवळ यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या.


