ताज्याघडामोडी

उमटे धरणातील पाणी पुरवठा व गाळ समस्या- जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ यांच्या लक्ष्यवेधी मुद्दा

उमटे धरणातील पाणी पुरवठा व गाळ समस्या-
जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ यांच्या लक्ष्यवेधी मुद्दा
रेवदंडा-महेंद्र खैरे- जिल्हा नियोजन भवन येथ्ो नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन सभेत पाणी समस्येचा पाढा वाचताना, उमटे धरणातील पाणी पुरवठा व गाळ समस्येवर नवनिर्वाचीत चौल जि.प.गटाचे जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ यांनी लक्ष्यवेधी मुद्दा उपस्थ्ाित केला.
या सभेत प्रांरभीच पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत बाकी सर्व शुन्य असल्याचे चौल जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ यांनी सांगून चौल जिल्हा परिषद गटातील रेवदंडा, चौल, नागाव, वरंडे तसेच आक्षी ग्रामपंचायतीस उमटे धरणातून पाणी पुरवठा होतो, हे उमटे धरण सन 1978 साली बांधण्यात आले असून 1995 साली जिल्हा परिषदेकडे हस्तातंरीत करण्यात आले आहे. परंतू तेव्हापासून उमटे धरणातील गाळ काढला गेला नसल्याचे त्यांनी लक्ष्यवेधी मुद्दा मांडला. शिवाय या उमटे धरणावर एकूण 33 वाडया व 47 गावे पिण्याच्या पाण्यासाठी विसंबून असल्याचे म्हटले. या उमटे धरणाच्या पाण्यावर हजारों लोकांचे जीवनमान अवंलबून आहे. परंतू परिसरात जानेवारी महिन्यापासून एक दिवस आड व मे महिन्यात तिन आड पाणी पुरवठा होतो. शासन महिला सक्षमीकरणासाठी विशेष लक्ष्य पुरविते, परंतू येथील महिला पाणी केव्हा मिळेल, पाणी केव्हा येईल या मुलभूत प्रश्नावर राहिल्या आहेत. तसेच परिसरात मोठ मोठे प्रकल्प येत आहेत, या प्रकल्पाला पाण्ाी कसे मिळते, येथील स्थानिकांना पाणी मिळत नाही प्रकल्पाला पाणी पुरवठा कसा होतो ? असा प्रश्न उपस्थित केला. शेवटी त्यांनी विकासा योजना महत्वाच्या मात्र तितकेच घरात पाणी सुध्दा महत्वाचे असल्याचे सांगून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विशेष लक्ष्य देण्याचे आवाहन केले.
चौल जिल्हा परिषद गटातून डाँ. सचिन राउळ हे पहिल्यांदा निवडून गेले आहेत. जिल्हा नियोजनाचा पहिल्याच सभेत उमटे परिसरातील वाडावस्ती, गावे तसेच चौल जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या रेवदंडा, चौल, वरंडे व नागाव तसेच आक्षी ग्रामपंचायतीत उमटे धरणातील पाणी पुरवठा तसेच जानेवारी व मे महिन्यात निर्माण होत असलेली पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येचा मुद्दा उपस्थित करून येथील लोकांच्या मनातील प्रश्नाला वाचा फोडली. नवनिर्वाचीत जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ यांनी उमटे धरण पाणी पुरवठा, तसेच गाळ व स्थानिकांच्या पाणी प्रश्न जिल्हा नियोजन समिती पुढे मांडल्याबद्दल स्थानिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *