रेवदंडयातील सुमित्र पतसंस्थेच्या नुतन पदाधिकारांची निवड अध्यक्षपदी खलिल इनुस तांडेल, उपाध्यक्षपदी हेमांगी साखळे यांची निवड
रेवदंडयातील सुमित्र पतसंस्थेच्या नुतन पदाधिकारांची निवड
अध्यक्षपदी खलिल इनुस तांडेल, उपाध्यक्षपदी हेमांगी साखळे यांची निवड
रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडयातील सुमित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नुतन पदाधिकारी निवड कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यामध्ये अध्यक्षपदी खलिल इनुस तांडेल व उपाध्यक्षपदी हेमांगी अभिजीत साखळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रेवदंडा सुमित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सभा गुरूवार दि. 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेअकरा वाजता पतसंस्थेच्या कार्यालयीन सभागृहात पार पडली, या सभेत पदाधिकारी नियुक्ती करता माननीय सचिव, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील आदेशाने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी मुख्य लिपिक चेतन पेटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या सभेत सुमित्र पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खलिल इनुस तांडेल व उपाध्यक्षपदी हेमांगी अभिजीत साखळे यांची निवड करण्यात आली, या निवडीकरता सुचक सुमित्र पतसंस्थेचे संचालक राजन वाडकर यांचे होते तर त्याना अनुमोदन सुमित्र पतसंस्थेचे संचालक महेंद नाईक यांनी दिले. सदर सभेत अध्यक्षपदी खलिल तांडेल व उपाध्यक्षपदी हेमांगी साखळे यांची निवड बिनविरोध झाली.
या सभेकरीता सुमित्र पतसंस्थेचे संचालक खलिल इनुस तांडेल, महेंद्र कमळाकर नाईक,उमेश रामचंद्र कोंडे, राजेंद्र सदाशिव वाडकर, अशोक जाया हवालदार, विजय सखाराम चौलकर,सदानंद शंकर घरत, प्रतिभा शरद वरसोलकर, कमरजब्बीन मुज्जफर मुकादम,हेमांगी अभिजीत साखळे,अनिस अ.स.हाजते, प्रतिभा प्रकाश सुर्वे यांची उपस्थिती होती. तसेच पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक नागावकर,व्यवस्थापक क्रांती जाधव तसेच कर्मचारीवर्ग यांची उपस्थिती होती.


