कोर्लई माउंट कार्मेल चर्च येथे गुड फ्रायडे दिवस साजरा
कोर्लई माउंट कार्मेल चर्च येथे गुड फ्रायडे दिवस साजरा
रेवदंडा-महेंद्र खैरे- कोर्लई माउंट कार्मेल चर्च येथे गुड फ्रायडे दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने ख्रिश्चन बांधव व भगिनी माउंट कार्मेल चर्च येथे उपस्थित होते.
ु यावेळी कोर्लई माउंट कार्मेल चर्च चे फादर यांचे मार्गदर्शनाखाली चर्च मध्ये विशेष प्रार्थना, उपसास आणि येशूच्या वधस्तंभाच्या यातनांचे स्मरण केले जाते. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण म्हणून गुड फ्रायडे अत्यंत शोकमग्न वातावरणात पाळला जातो. गुड फ्रायडे हा दिवस त्याग व क्षमेचे प्रतीक मानला जातो. कोर्लई येथे मोठया उत्साहात गुड फ्रायडे साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्व आहे. हा दिवस कोर्लई ख्रिश्चन पाडयात सण म्हणून साजरा करण्यात येतो.


