न्हावे येथील आमदार भगवा चषकचा प्रथम विजेता अंगस्त् इलेव्हन वैतागवाडी
न्हावे येथील आमदार भगवा चषकचा प्रथम विजेता अंगस्त् इलेव्हन वैतागवाडी
व्दितीय सागर सम्राट न्हावे, व तृतीय साई दत्त न्हावे
रेवदंडा-महेंद्र खैरे-रोहा तालुक्यातील न्हावे येथील श्री राम स्पोर्ट्स सोनखार आयोजीत आमदार भगवा चषक 2026 भव्य टेनिस बॉल मर्यादील षटकांचे क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा विजेता अंगस्त इलेव्हन वैतागवाडी संघ ठरला तर व्दितीय क्रमांक सागर सम्राट न्हावे, तृतीय क्रमांक साई दत्त न्हावे या संघाने पटकाविले. या स्पर्धेत उत्कृष्ट फलदांज राजन पाटील,उत्कृष्ट गोलदांज मुस्तकिन मुकादम, मालिकावीर आकाश भायतांडेल, अंतिम सामन्यातील सामनावीर हुसेन टाकी यांची निवड करण्यात आली.
श्री राम स्पोर्ट्स न्हावे-सोनखार या संघ तसेच चणेरा शिवसेना विभाग प्रमुख गैनिनाथ कटोर यांचे वतीने दि. 28,29,30,31 मार्च 2026 रोजी मर्यादीत षटकांचे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे विजेत्यास रूपये 1 लाख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 50 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपय 25 हजार व भव्य चषक, चतुर्थ क्रमांकास रूपये 25 हजार व भव्य चषक तसेच उत्कृष्ट फलदांज, उत्कृष्ट गोलदांज, तसेच सामनावीर यांना चषक व रोख पारितोषीक तसेच मालिकावीराला सायकल अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी बक्षिस वितरण समारंभास जिल्हा परिषद सदस्य राजपुरी गट विघ्नेश माळी, शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर, जि.प.सदस्य चणेरा गट उर्वशी वाडकर, विभाग प्रमुख विकास पाटील, जेष्ठ शिवसैनिक आप्पा मयेकर, युवासेना प्रमुख सुदर्शन गावडे, शिवसैनिक सुरज पवार, चणेरा शाखा प्रमुख प्रसन्न घाग, उपसरपंच कोकबन तुषार वाजंत्री, आरेबद्रुक शाखा प्रमुख गणेश दळवी, धोंडखार शाखा प्रमुख सनी म्हात्रे, महादेव खार शाखा प्रमुख अस्मिता मांदाडकर,न्हावे ग्रा.प.ग्रामसेवक दिपक वारंगे, कोकबन शाखा प्रमुख निलेश सुभेदार चणेरा महिला शिवसेना संघटना अस्मिता मांडवकर, आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.
या स्पर्धेत पंचाचे काम नितेश नरहरी, कल्पेश म्हात्रे व रोशन भोईर यांनी केले तर समालोचना प्रदिप भोईर व उपेश भायतांडेल यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गैनिनाथ कटोर, करण कटोर, जीवन दिवकर, भास्कर कासकर, विदेश सर्लेकर, संग्राम कासकर, साहिल कासकर, रामनाथ कोटकर तसेच श्री राम स्पोर्टस् सोनखार-न्हावे या संघाने विशेष परिश्रम घेतले.


