ताज्याघडामोडी

चौल तुलाडदेवी श्री धावीर उत्सवाला अलोट गर्दी श्रध्दा व भक्तीची लाट विधी भाविकतेने साजरी

चौल तुलाडदेवी श्री धावीर उत्सवाला अलोट गर्दी
श्रध्दा व भक्तीची लाट विधी भाविकतेने साजरी
रेवदंडा-महेंद्र खैरे-चैत्र पौर्णिमेच्या सायकांळी, चौल तुलाडदेवी येथील श्री धावीर उत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. या उत्सवाचे निमित्ताने लाट विधी मोठया श्रध्देने व भाविकतेने साजरा करण्यात आला.
चौल तुलाडदेवी नजीकच्या डोंगरात पायथ्याशी श्री धावीर मंदिर आहे. या मंदिरात चैत्र पौर्णिमेच्या शेवटच्या दिवशी सायकांळी उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात मोठया संख्येने पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती असते. चौल तुलाडदेवी नजीकचे हे मंदिर प्राचीन असल्याचे सांगितले जाते, शिवाय श्री धावीर मंदिराचे उत्सवाचे दिवशी परंपरागत धार्मिक विधी पार पडतो, या विधीला लाट विधी म्हटले जाते. या मंदिरातील उत्सवाला लाट यात्रा सुध्दा संबोधले जाते. यावेळी मोठया संख्येने भाविक श्री धावीराचा दर्शनाचा लाभ घेवून लाट विधीत सहभागी होतो.
या श्री धावीराचे उत्सवाला मंदिरात अनेकाचे अंगात देव संचारतो, अंगात संचारलेला देवाने वैताच्या छड्डीने अंगावर मारून घेत असतो. यावेळी उपस्थित भक्तमंडळी अंगात संचारलेल्या देवाकडे नतमस्तक होतात. मंदिराचे बाजूलाच बगात पंरपरागत उभी आहे, या बगातीचा मानाची काठी चौलची भगत आळी तसेच वरंडेपाडा यांचेकडे असतो. बगातीची उंची 15 फुट असून शके 1841 पासून बगात तेथे उभी आहे. या बगातीला बोकड अथवा कोंबडाचा मान म्हणून या बगातीला बोकड व कोंबडा बांधून भक्तगण बगातीला बसलेल्या देवाना पाच वेळा गोल गोल फिरवितात. यावेळी धावीर देव,महामरी, तसेच चौल पंचक्रोशीतील 23 देवाधिकांना हा मान बगातीच्या माध्यमातून पोहचविला जातो.
प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेचा शेवटच्या सायकांळी श्री धावीर उत्सवासह ही लाटेची यात्रा भरते. चौल पंचक्रोशीतील भाविक मोठया श्रध्दा व भक्तीने या श्री धावीर उत्सवास व लाट यात्रेस येत असतात. रात्रीचे समयी बोकड व कोंबडा यांचा मान देवाला देवून त्याचे प्रसादास येथील पंचपाखाडीचे सभासद घेतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *