रेवदंडयात देव-देवस्कीला उत, अंधश्रध्दा निर्मुलन कागदावरच
रेवदंडयात देव-देवस्कीला उत, अंधश्रध्दा निर्मुलन कागदावरच
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडयात सध्या देव-देवस्कीला उत आला असून अनेक ठिकाणी गल्ली बोळात, अडगळीच्या ठिकाणी लिंबू, अंबीर,गुलाल, व हळदीचे पट्टे निदर्शनास येतात. एकदंरीत अंधश्रध्दा निर्मुलन कागदावरच राहिली असून रेवदंडयात अंधश्रध्दा भक्ताची संख्या दिवसेंदिवस वाढीस जात असल्याचे चित्र दिसते.
रेवदंडा प्राथमिक शाळेतील वर्गातच पाठीमागील दाराने प्रवेश करून कोणीतरी अज्ञाताने देव-देवस्कीचा प्रकार केल्याने खळबल उडाली. येथे लिंबू, हळद, आंबीर, गुलाल तसेच रक्ताचे दाग सुध्दा दिसत असल्याचे निदर्शनास आले. मात्र देव-देवस्कीसाठी शाळेचा वर्गच निवडल्याने ग्रामस्थ तसेच पालकवर्ग यामध्ये चिंता दिसून आली.
सध्या राजकीय तेढ, तसेच व्यावसायीक स्पर्धा यामधून देव-देवस्कीला भर मिळतोय, रेवदंडयात सध्या कंस्ट्रशन, व राजकीय व्यवसायात कमालीची तेढ वाढीस जात आहे, विरोधकांच्या उन्नतीला व गतीला ब्रेक देण्यासाठी असे देव-देवस्कीचे प्रकार सुरू आहेत. यामध्ये मध्यम वर्गिय व व्यावसायीक वर्ग जास्त आकर्षीत असल्याचे म्हटले जाते. अनेकदा ठिकठिकाणाहून मंत्रतंत्र करणारे महागुरूना सुध्दा पाचारण करण्यात येते, निवडणूक दरम्यान जिकडे तिकडे असे देवदेवस्कीचे प्रकार घडल्याची चर्चा जोरदार होती. मात्र निवडणुक संपल्यावर सुध्दा होत असलेली देव-देवस्की ही कस्ट्रशन आदी व्यावसायीक रस्सीखेचातील प्रकाराने घडून येत असल्याचे सांगितले जाते.
गेल्या स्थानिक स्वराज्य निवडणूक दरम्यान चौल मधील दादर येथे अश्याचा प्रकारची देव-देवस्कीचा प्रकार उघडकीस आला होता. तर दोन दिवसापुर्वी रेवदंडा प्राथमिक शाळेत सुध्दा असा देव-देवस्कीचा लिंबू, हळद,गुलाल, आंबीर फिरवून टाकल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याबाबत रेवदंडा पोलिसानी रितसर पंचनामा केला आहे.


