भाजप स्वबळावर निवडणुक लढण्यास सक्षम – सरचिटणीस अँड महेश मोहिते
भाजप स्वबळावर निवडणुक लढण्यास सक्षम – सरचिटणीस अँड महेश मोहिते
रेवदंडा-महेंद्र खैरे- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने स्वतःला अजमावले असून प्रत्येक निवडणूकीत भाजपची ताकद किती , असा प्रश्न उपस्थित केला जात होता, त्यास प्रतिउत्तर दिले आहे. गेल्या निवडणुकीत अपयश आले परंतू कुर्डूस, मापगाव, चणेरा, बेलोशी, चौल व मुरूड आदी विधानसभा मतदारसंघातील गटामध्ये पन्नास हजार मते भाजपने मिळविली आहेत, त्यामुळे आगामी निवडणूक स्वबळावर लढण्यास भाजप सक्षम आहे, असे प्रतिपादन भाजप दक्षिण जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते यांनी चौल येथे दक्षिण मंडळ पदाधिकारी नियुक्ती पत्रक वाटप कार्यक्रमामध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना केले.
भाजपचा अलिबाग तालुक्यातील दक्षिण मंडळ पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम चौल मुखरी श्री गणेश मंदिर येथे सोमवार दि. 23 मार्च रोजी सायकांळी पाच वाजता घेण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते, भाजप महिला जिल्हा मोर्चा अध्यक्ष चित्रा पाटील, अँड आस्वाद पाटील, उपाध्यक्ष संदिपभाई घरत, माजी जिल्हा अध्यक्ष हेमंत दांडेकर, सतिश लेले, माणिक बळी, मंदाताई बळी, दक्षिण मंडळ प्रमुख अशोक वारगे, विश्वास जोशी, संकेत जोशी आदीची उपस्थिती व्यासपिठावर होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत चौल भाजपचे वतीने हेमंत दांडेकर, विश्वास जोशी, संकेत जोशी आदीचे हस्ते पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित दक्षिण मंडळ भाजप कार्यकर्त्याना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले यामध्ये अलिबाग दक्षिण मंडळ सरचिटणीस संकेत जोशी, सरचिटणीस समीर घरत, उपाध्यक्ष राकेश अवचटकर, उपाध्यक्ष एससी/एसटी गजानन पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर टिवळेकर, चिटणीस प्रतिभा प्रकाश भांजी, कोषाध्यक्ष शैलेश म्हात्रे, महिला सदस्य ममताबेन दिलिप पटेल, महिला सदस्य एससी/एसटी वैशाली झेंडेकर, महिला सदस्या मुग्धा विश्वास जोशी, महिला सदस्य एससी/एसटी बबिता संदिप खंडेराव, सदस्य गजानन झेडेंकर,सदस्य जगन ठाकूर, सदस्य रत्नदिप उदय खंडेराव, सदस्य पुजा किरण खंडेराव, सदस्य रूपाली प्रमोद बळी, सदस्य शलाका निलेश कोंडे, सदस्य प्रमोद बळीराम बळी, सदस्य उदय कृष्णा खंडेराव, सदस्य प्रज्वल किशोर गणतांडेल, सदस्य संदेश शिंदे, सदस्य संदेश पडवळ, सदसय सतिश म्हात्रे, सदस्य अजय नाईक, युवामोर्चा दक्षिण मंडळ उपाध्यक्ष विक्रम रविंद्र सुर्वे, सरचिटणीस जयेश नारायण साळावकर, सरचिटणीस रोहीत रविंद्र पाटील,तसेच दक्षिण मंडळ शक्तीकेंद्र प्रमुख जगदीश कांबळे, मयुर झावरे, विश्वास जोशी, दिलिप पटेल, व सतिश लेले यांना पदाचे नियुक्ती पत्र उपस्थित मान्यवर ॲड महेश मोहिते, चित्रा पाटील, अँड आस्वाद पाटील, मंदाताई बळी, संदिपभाई घरत यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी उपस्थित भाजप दक्षिण मंडळ पदाधिकारांना मार्गदर्शन करताना जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील यांनी सर्व दक्षिण पदाधिकारांसह महिला पदाधिकारांची निवड करण्याचे मनोगत व्यक्त केले, जेणेकरून भाजप पदाधिकारी व कार्यकते यांची ताकद वाढेल व मतदार वाढीस कारणीभूत ठरेल असे म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास जोशी व कार्यक्रमात उपस्थितांचे आभार हेमंत दांडेकर यांनी व्यक्त केले.


