ताज्याघडामोडी

चौल मध्ये भाजप कार्यशाळेस प्रारंभ

चौल मध्ये भाजप कार्यशाळेस प्रारंभ
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौल मध्ये भाजप पक्षाची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आहे, या कार्यशाळेत भाजपचे अलिबाग तालुक्यातील दक्षिण, मध्य, व उत्तर विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.
चौल येथील वसुंधरा कॉटेज येथे शुक्रवार दि. 27 व 28 मार्च रोजी दोन दिवशीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 अंतर्गत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची कार्यशाळा सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला. या निमित्त भाजपचे दक्षिण जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते, भाजप जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील, भाजपचे नेते अँड आस्वाद पाटील, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्षा अँड मनस्वी मोहिते, माजी जिल्हा अध्यक्ष्ा हेमंत दांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदिपभाई घरत, माजी तालुका अध्यक्ष उदय काठे, सतिश लेले, आदी प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थितीसह भाजपचे अलिबाग तालुका दक्षिण,मध्य व उत्तर मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेस दक्षिण मंडळ अध्यक्ष अशोक वारगे, मध्य मंडळ अध्यक्ष रोशन भगत, उत्तर मंडळ अध्यक्ष केतन पाटील यांच्यासह चौलचे विश्वास जोशी, संकेत जोशी, तसेच दिलिप पटेल, माणिक बळी, मंदाताई बळी आदीने विशेष परिश्रम होते.
या कार्यशाळेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दि. 27 मार्च रोजी भाजपची कार्यपध्दती, कार्य विस्तार व दृष्टी, बुथ व्यवस्थापन व मन की बात, इतिहास व विकास, सोशल मिडिया व नमो ॲप या विषयी मार्गदर्शन तसेच दि. 28 मार्च रोजी वैचारीक अधिस्तान, केंद्र व राज्य सरकार योजन या विषयी मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. या कार्यशाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षक म्हणून मंगेश दळवी, यौवन चाफेकर, निलेश मोरे, आलाप मेहता, श्वेता ताडफळे, गिरीष तुळपुळे व हाजी कोठारी यांनी जबाबदारी स्विकारली होती.
या दोन दिवशीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 प्रारंभ भाजपचे ॲडं आस्वाद पाटील, चित्राताई पाटील तसेच हेमंत दांडेकर, उदय काठे,संदिपभाई घरत, मंदाताई बळी आदीचे हस्ते दिपप्रज्वलनने तसेच चित्राताई पाटील यांचे हस्ते प्रतिमेचे पुजाअर्चा करून करण्यात आला.

फोटो ओळ- चौल वसुंधरा कॉटेज येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान राबविण्यात आला. त्याचा प्रारंभ अँड आस्वाद पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी चित्रा पाटील, हेमंत दांडेकर, उदय काठे, संदिपभाई घरत, मंदाताई बळी, संकेत जोशी आदी मान्यवर उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *