फेस्कॉन जेष्ठाच्या उन्नतीसाठी झटणारी संस्था -कोकण विभाग अध्यक्ष विलास काळे यांचे प्रतिपादन

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;
रेवदंडा-महेंद्र खैरे-जेष्ठाच्या उन्नतीसाठी सन 1980 सालापासून फेस्कान संस्था झटणारी संस्था असून जेष्ठांच्या विविध समस्या तसेच मदतीसाठी सदैव सोडविण्यासाठी तत्पर असते असे प्रतिपादन जेष्ठ संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास काळे यांनी केले, यावेळी त्यांनी जेष्ठाच्या कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून कामाचा ताण पडत असल्याने त्यांची विभागणी करून जिल्हास्तरीय प्रदेश अध्यक्ष नेमण्यात यावे, जेणेकरून जेष्ठ नागरिक संघाचे विविध प्रश्न तत्परतेने सोडविता येतील व सुविधा निर्माण करता येतील अशी सुचना त्यांनी मांडळी.
चौल श्रीगणेश मुखरी मंदिराचे सभागृहात चौल जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन व रौप्य महोत्सव सांगता दिन सांगता दिन शनिवार दि. 21 मार्च रोजी सायकांळी साडेचार वाजता आयोजीत करण्यात आला होता. या प्रसंगी व्यासपिठावर अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष विलास काळे, जेष्ठ नागरिक संघाचे कोकण विभागीय सचिव दिपक करकरे, तसेच जेष्ठ नागरिक संघटना समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पालकर तसेच चौल जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष सतिश दत्तात्रेय मनोहर, उपाध्यक्ष दिपक सखाराम तळेकर,उष्ाा वैदय, सचिव देवानंद दत्तात्रेय पोवळे,तसेच रौप्य महोत्सव समिती अध्यक्ष रोहिदास म्हात्रे, सचिव विनोद जाधव यांची उपस्थिती होती. तसेच मोठया संख्येने चौल जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्यांची उपस्थिती होती.

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;


