ताज्याघडामोडी

नागाव मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा बोजाबारा

नागाव मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा बोजाबारा

रेवदंडा-महेंद्र खैरे- जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम जाणिवपुर्वक रखडून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचीत ठेवल्याचा आरोप नागाव ग्रा.प.सरपंच हर्षदा मयेकर यांनी राजिप कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांना निवेदनाव्दारे केला असून यांची चौकशी होवून कायदेशीर कार्यवाही अशी मागणी केली आहे.
नागाव ग्रा.प. सरपंच हर्षदा मयेकर यांनी राजिप कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांना निवेदनाव्दारे केला असून यांची चौकशी होवून कायदेशीर कार्यवाही अशी मागणी केली आहे.
नागाव ग्रा.प. सरपंच हर्षदा मयेकर यांनी राजिप कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागाव गावासाठी जल जीवन मिशन अंतर्ग मंजूर करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात पुर्ण झालेली नाही, तसेच सध्या काम पुर्णतः बंद अवस्थेत आहे, हे अंत्यत गंभीर व लज्जास्पद व लोकहिताचा पुर्णतः विरोधात असल्याचे म्हटले आहे, या कामाचे सुरूवात ठेकेदार विवेक पाटील यांचे मार्फत करण्यात आली. मात्र कोणतेही कारण न देता, ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता, सदर काम पुणे येथील दुसऱ्या ठेकेदारास हस्तातंरीत करण्यात आले. हे हस्तातर कोणाच्या आदेशाने व कोणत्या नियमाखाली व कोणत्या अटीवर करण्यात आले, याबद्दलची कोणतीही माहिती आजतागायत देण्यात आलेली नाही. शिवाय हे काम हस्तातंरीत होवून अनेक महिने उलब्ून गेले असतानाही प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नाही, परिणामी समस्त नागाववासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून महिला, वृध्द व लहान मुले यांना अमानवी त्रास सहन करावा लागतोय, तर पाण्यापासून वंचीत ठेवणे हे संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्काचे थेट उल्लंघन आहे असे म्हटले आहे. ही परिस्थिती केवळ निष्काळजीपणाची नसून संबधीत ठेकेदार, अधिकारी व यंत्रणामधील दुर्लक्ष, अकार्यक्षमता व संभाव्य संगनमत दर्शविते, शासन निधीचा गैरवापर कागदपत्री प्रगती दाखवून प्रत्यक्षात काम न करणे व शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची बदनामी करणे, असे गंभीर आरोप उपस्थित होत असल्याचेही म्हटले आहे.
या निवेदनपत्राव्दारे सदर पाणी पुरवठा काम तात्काळ सुरू करून निश्चित कालमर्यादीत पुर्ण करण्याचे लेखी आदेश देण्यात यावेत, किंवा सध्यस्थितीत हस्तांतरीत केलेल्या ठेकेदार रद्द करून ग्रामपंचायतीला विश्वासात घेवून खरोखर काम करणारा व विश्वासू ठेकेदार नियुक्त करण्यात यावा, काम हस्तातंरीत करण्या प्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करून दोषी ठेकेदार व जबाबदार अधिकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ग्रामस्थांना तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात पाणी टँकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, आजपर्यंत झालेल्या विलंबाबाबत स्पष्ट खुलासा देण्यात यावा, आदी मागण्या केल्या आहेत.
शिवाय या पत्राची सात दिवसात ठोस व प्रत्यक्ष समाधानकारक कार्यवाही न झाल्यास सदर बाबत जिल्हाधिकारी राज्य जलजीवन मिशन कार्यालय, लोकायुक्त, तसेच प्रसादमाध्यमाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल व यांची संपुर्ण जबाबदारी संबधीत विभागावर राहील तसेच हे पत्र अंतिम इशारा स्वरूपाचे असून यानंतर कोणतीही पुर्व सुचना न देता कायदेशीर मार्ग अवंलबण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आल आहे.
फोटो ओळ- नागाव ग्रा.प.सरपंच हर्षदा मयेकर व अन्य राजिप कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांना निवेदन प्रत प्रदान कराताना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *