थेरोंडा ते श्री क्षेत्र एकविरा कार्ला पालखी सोहळयास प्रारंभ; दिलिपशेठ भोईर-छोटमशेठ यांची उपस्थिती

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;
थेरोंडा ते श्री क्षेत्र एकविरा कार्ला पालखी सोहळयास प्रारंभ; दिलिपशेठ भोईर-छोटमशेठ यांची उपस्थिती
रेवदंडा-महेंद्र खैरे-जय मल्हार मित्रमंडळ थेरोंडा आयोजीत थेरोंडा ते श्री क्षेत्र एकविरा कार्ला पदयात्री पालखी सोहळयास मोठया उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी थेरोंडा पिरांचे देउळ येथे या पालखी सोहळयास माजी समाजकल्याण सभापती दिलिपशेठ भोईर उर्फ छोटमशेठ यांनी उपस्थित राहून भक्तीभावाने पदयात्रीस शुभेच्छा दिल्या, व पालखीस खांदा दिला देत, पदयात्रीच्या वाटचालीस सहभागी झाले.
थेरोंडा ते एकविरा कार्ला पालखी सोहळयास जय मल्हार मित्रमंडळ थेरोंडाचे वतीने बुधवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता थेरोंडा खंडेराव पाडा एकविरा मंदिर येथून प्रांरभ झाला. या पालखी सोहळयास जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलिपशेठ भोईर उर्फ छोटमशेठ यांनी उपस्थित राहून पालखी पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पालखी सोहळयास सहभागी होउन, मोठया भक्तीने पालखी खांदयावर घेउन पदयात्रीसह अलिबाग कडे प्रस्थान केले. यावेळी जय मल्हार मित्रमंडळ थेरोंडा पदयात्री पालखी सोहळा अध्यक्ष सुरेल कोंडे, उपाध्यक्ष शरद नवगावकर, खजिनदार अनिल कोंडे, सेक्रेटरी रविंद्र चौलकर, गुरव निरजंन भगत आदीच्या उपस्थितीत दिलिपशेठ भोईर उर्फ छोटमशेठ यांच्या सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आला.
जय मल्हार मित्रमंडळ थेरोंडा आयोजीत पदयात्री पालखी सोहळा एकविरा कार्ला येथे रविवार दि. 15 डिसेंबर रोजी प्रस्थान करेल अशी माहिती मंडळाचे वतीने देण्यात आली. या पालखी सोहळयास मोठया संख्येने थेरोंडा पाच पाडा मधील युवकांनी सहभाग घेतला आहे. तसेच सुनिल खेडू, सतिश झांडराव, मुकेश कोंडे, यश धंबा, जयराम बलकवडे, सुमित टिवळेकर,अतिल हाले, मयुर भगत, ॠषीकेत टिवळेकर, निशिकेत तांडेल, नरेश मुजावर, सतिष हाले, संकेत राक्षीकर हे कमिटी सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.







