आग्राव येथील क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 53;
आग्राव येथील क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ
रेवदंडा-महेंद्र खैरे- आगामी जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार डाँ. सचिन राउळ व चौल शिवसेना शाखा पुरस्कृत भव्य टेनिस बॉल मर्यादीत षटकांच्ो ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ आग्राव येथील सुसज्ज मैदानात संपन्न झाला.
आग्राव येथे मरूआई क्रिकेट संघ आग्राव आयोजीत टेनिस बॉल मर्यादीत षटकांच्ो ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ शुक्रवार दि. 19 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आला. या प्रसंगी आगामी जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार डाँ. सचिन राउळ यांच्या प्रमुख उपस्थितीसह शिवसेना जेष्ठ नेते नारायण मुंबईकर, चौल पंचायत गण शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत शेणवईकर, चौल शिवसेना शाखा प्रमुख स्वप्निल शेवणईकर, रणजीत धरणकर, सुधीर चेरकर, महेंद्र चौलकर, भुषण घरत, शिवसेना मुरूड-अलिबाग महिला संघटिका तनुजा घरत, अशोक गुरव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी डाँ. सचिन राउळ यांचे शुभहस्ते शिवप्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करण्यात आली, त्यानंतर नारायण मुंबईकर यांचे हस्ते श्री गणेशाचे पुजन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचे उपस्थितीत डाँ. सचिन राउळ यांचे हस्ते श्रीफळ वाढवून क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेत एकूण 24 संघाचा प्रवेश देण्यात आला आहे, स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये 50 हजार रोख व भुषण घरत पुरस्कृत चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 25 हजार रोख व भुषण घरत पुरस्कृत चषक, तृतीय क्रमांकास रूपये 15 हजार रोख व भुषण घरत पुरस्कृत चषक तसेच रणजीत धरणकर पुरस्कृत मालिकावीर सायकल, रणजीत धरणकर पुरस्कृत उत्कृष्ट फलदांज सायकल, तसेच सुरज लोहार पुरस्कृत उत्कृष्ट गोलदांज सायकल तसेच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचे सुत्रसंचलन व समालोचन यासीन मर्चंट व इम्रान बुखारी तसेच पंचाचे काम नितेश नरहरी व कल्पेश म्हात्रे हे करत आहेत. स्पर्धेसाठी डाँ. सचिन राउळ यांचे मार्गदर्शनाखाली मरूआई क्रिकेट संघ सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.







