काकळघर ग्रा.प. येथे आदिवासींना ब्लॅकेंट वाटप कार्यक्रम
काकळघर ग्रा.प. येथे आदिवासींना ब्लॅकेंट वाटप कार्यक्रम
लायन्स क्लब ऑफ मुरूड व मांडवा-अलिबाग स्तुत्य उपक्रमाने
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यातील काकळघर ग्रामपंचायतीच्या सभागृहात आदिवासीना ब्लॅकेंट वाटप कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
लायन्स क्लब ऑफ मुरूड व मांडवा-अलिबाग स्तुत्य उपक्रमाने आदिवासी वाडी महाळूंगे व ठाकूरवाडी महाळुंगे बु. यांना मोफत ब्लंकेट वाटप कार्यक्रम शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता घेण्यात आला. यावेळी लायन्स क्लब ऑफ मुरूडचे विदयमान अध्यक्ष सनी सोगांवकर, शिवसेना तालुका प्रमुख निलेश घाटवळ, लायन्स सि.एम.ठाकूर, काकळघर ग्रामपंचायत सरपंच स्वस्तिक ठाकूर, उपसरपंच निशांत दांडेकर, शिवसेना महिला विभाग प्रमुख व मांडळा ग्रा.प.माजी सरपंच साक्षी गायकवाड,मुरूड पं.स.माजी सभापती व ग्रा.प.सदस्या काळीताई ठाकूर, अशोक मुरूडकर, समीर कोटकर, लायन्स विकास काकुर्डे, दिघे, धर्मेद्र गायकवाड तसेच मोठया संख्येने आदिवासी वाडी महाळूंगे व ठाकूरवाडी महाळुंगे बु. समाज बांधव व भगिनी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुरूवातीस काकळघर ग्रामपंचायतीचे वतीने उपस्थित मान्यवर लायन्स क्लब ऑफ मुरूड अध्यक्ष सनी सोगांवकर, लायन्स सि.एम.ठाकूर, लायन्स विकास कातुर्डे, तसेच शिवसेना मुरूड तालुका प्रमुख निलेश घाटवळ, महिला विभाग प्रमुख साक्षी गायकवाड, आदीचे स्वागत सरपंच स्वस्तिक ठाकूर, उपसरपंच निशांत दांडेकर, सदस्या काळीताई ठाकूर यांचे हस्ते शाल,पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धर्मेद गायकवाड यांनी केले.
लायन्स क्लबच्या वतीने नित्याने गरीब व गरजू लोकांसाठी लोकोपयोगी कामे विविध स्तुत्य उपक्रमाने राबविली जातात, या समाजउपयोगी कामाने सामाजीक बांधिलकीचे काम लायन्स क्लब साधत असते, असे लायन्स सि.एम. ठाकूर यांनी म्हटले. तत्पुर्वी मान्यवराचे हस्ते उपस्थित आदिवासी वाडी महाळूंगे व ठाकूरवाडी महाळुंगे बु. यांना मोफत ब्लंकेट वाटप करण्यात आले. शेवटी सरपंच स्वस्तिक ठाकूर यांनी उपस्थित मान्यवराचे आभार व्यक्त केले.







