ताज्याघडामोडी

प्रशांतदादा मिसाळ पुरस्कृत मुरूड तालुका प्रिमिअर लीग मध्ये वाघोबा-मुरूड प्रथम विजेता

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 26;
प्रशांतदादा मिसाळ पुरस्कृत मुरूड तालुका प्रिमिअर लीग मध्ये वाघोबा-मुरूड प्रथम विजेता
रेवदंडा-महेंद्र खैरे- शिवसेना उबाठा उपजिल्हा प्रमुख प्रशांतदादा मिसाळ पुरस्कृत मुरूड तालुका प्रिमिअर लीग मध्ये वाघोबा-मुरूड संघ प्रथम विजेता ठरला, तर व्दितीय क्रमांकाचा मानकरी गुरू 11 चेहेर संघाने तसेच तृतीय क्रमांक युवी र्स्पोर्टस्‌‍ सुरई संघाने पटकाविला. या स्पर्धेत मालिकावीराचा युवी स्पोर्ट्स सुरई संघाचा राज पाटील-मोटर सायकल, उत्कृष्ट गोलदांज युवी स्पोर्टस्‌‍ संघाचा हिमांशू मिसाळ-फ्रिज, उत्कृष्ट फलंदाज गुरू 11 चेहेर संघाचा जयेश घाग-फ्रिज, तसेच संघ मालक वाघोबा-मुरूड संघाचा प्रतोप वरसोलकर-मोटर सायकल यांची निवड करण्यात आली.
बोर्ली येथे दि. 28,29,30, 31 डिसेंबर रोजी आयोजीत टेनिस बॉल मर्यादीत षटकांच्या मुरूड तालुका प्रिमिअर लीग स्पर्धा शिवसेना उबाठा उपजिल्हा प्रमुख प्रशांतदादा मिसाळ यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेचा ऑक्शन कार्यक्रम बोर्ली येथे दि. 7 डिसेंबर रोजी घेण्यात आला होता. मुरूड प्रिमिअर लीग स्पर्धेत एकूण 24 संघ खेळविण्यात येत आहेत, यामध्ये सिध्दी इलेव्हन काशिद- आकाश महाडिक, वन फॅमिली सर्वे -निखिल धार्वे, आई एकविरा बोर्ली-सुनिल पाटील, इगल 11 येसदे-कृतार्थ चवरकर, युवी स्पोटर्स सुरई-राज पाटील, तुळजा भवानी कोर्लई-शिवतेज पाटील, युवा सरपंच-जम्बो, शंभुराजे ताडवाडी-सनी डोलकर, लबैक मांडळा-फहाद कळबसकर, राध्या 11 साळाव-अक्षय कांबळी, वन सोल्युशन कोर्लई-जयेश म्हात्रे, पठाण 11 कोर्लई -उमेश घाणेकर, जन्नत मांडळा-प्रज्वल पालवणकर, दाब धाबा तळेखार-नितू भुरे, भाई 11 तळेखार-विजय घाणेकर, पि.पि. स्पोर्ट्स मिठेखार-तेजस काटकर, दक्ष 11 बारशीव -निलेश किंजले, गुरू इलेव्हन चेहेर-निशांत पालवणकर, एस. के. कंस्ट्रशन मजगाव -पराग खोत, वाघोबा मुरूड-दिवेश ब्रावो, प्रदिप रामा खेडेकर पुरस्कृत खेडेकर 11 चिकणी-विकास खेडेकर, जंजिरा पांईट मुरूड खारआंबोली-हुसेन टाकी, अजिक्य 11 बोर्ली-राज धार्वे, राज 11 आगरदांडा आशिष चिंदरकर या टिम व कर्णधार यांच्या सहभाग होता, स्पर्धेचा शुभारंभ दि. 28 डिसेंबर रोजी मोठया शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, जि.प.माजी सदस्या राजश्री मिसाळ यांचे प्रमुख उपस्थितीत व वळके ग्रा.प.माजी सरपंच किशोर काजारे, सनी सोंगावकर, चंद्रकांत मोहिते, नांदगाव ग्रा.प.सरपंच सेजल घुमकर, सुदेश घुमकर, उपकार खोत, सामाजीक कार्यकर्ते संदेश पाटील, विभाग प्रमुख नरेश कुबल, तालुका अध्यक्ष नौशाद दळवी, भारत मोती, आदी मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.
मुरूड तालुका प्रिमिअर लीग स्पर्धेचे जमीर दाखवे उर्फ जम्बो-अध्यक्ष, धनजंय मुंबईकर-उपाध्यक्ष व संकेत सुतार, दिपक पाटील, प्रणय शेळके, शिवतेज पाटील यांची नियोजन कमिटी क्रियाशील आहे. स्पर्धेचे गुणलेखन धरणे गुरूजी, सुत्रसंचलन व मालोचन वेदांत कंटक , इम्रान बुखारी, हर्षद हिंगे तसेच स्पर्धेचे पंचाचे काम नासिर शेख, राजेश क्षिरसागर, रूपेश सावंत, धनंजय कोळी यांनी पाहिले.
शिवसेना उबाठा उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ पुरस्कृत मुरूड तालुका टेनिस बॉल क्रिकेट मर्यादीत षटकांच्या प्रिमिअर लीग स्पर्धेत प्रथम क्रमांकास भव्य चषक व रोख रक्कम 1 लाख्ा रूपये, व्दितीय क्रमांकास भव्य चषक व रोख रक्कम 50 हजार रूपये, तृतीय क्रमांकास भव्य चषक व 35 हजार रूपये तसेच सर्वोकृष्ट खेळाडूस मोटर सायकल, उत्कृष्ट संघमालक मोटर सायकल व सामनावीर, उत्कृष्ट गोलदांज व फलदांज यांना आकर्षक बक्षिसे उपस्थित मान्यवर शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख प्रशांतदादा मिसाळ, माजी जि.प.सदस्य राजश्री मिसाळ, किशोर काजारे, जावेद गोरमे आदीच्या हस्ते वितरीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *