साळाव जेएसडब्लू कंपनीत 55 वा राष्ट्रीय सुरक्षा दिन उत्साहात साजरा
साळाव जेएसडब्लू कंपनीत 55 वा राष्ट्रीय सुरक्षा दिन उत्साहात साजरा
रेवदंडा-महेंद्र खैरे- राष्ट्रीय सुरक्षा दिन 4 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो, त्यानिमित्ताने साळाव जेएसडब्ल कंपनीत 55 वा राष्ट्रीय सुरक्षा दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास साळाव जेएसडब्लू कंपनीचे व्यवस्थापक प्लॅन्ट हेड पंकज मलिक यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच साळाव अग्नीक्षामक दलाचे योगेश वासनिक, जितेंद्र आचार्य, प्रफुल्ल्ा म्हात्रे तसेच साळाव जेएसडब्लू कर्मचारीवर्ग यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन अग्नीक्षामक दलाचे योगेश वासनिक यांचे मार्गदर्शनाखाली सुरक्षा कर्मचारी यांनी केले.
प्रारंभी मान्यवर उपस्थित कंपनी हेड पंकज मलिक यांचे हस्ते दिपप्रज्वलन तसेच सुरक्षा ध्वजाचे अनावरण करण्यात आले, त्यानंतर साळाव कर्मचारीवर्गास सुरक्षा शपथविधी देण्यात आला. यावेळी साळाव अग्नीक्षामक दलाचे योगेश वासनिक यांनी प्रमुख अतिथी कंपनी हेड पंकज मलिक यांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून केले. या राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे औचित्याने विविध स्पर्धेचे आयोजन साळाव जेएसडब्लू कंपनी अंतर्गत घेण्यात आले होते, तसेच अग्नीक्षामक दलाचे सामुग्रीचे प्रदर्शन सुध्दा ठेवण्यात आले होते. यावेळी कंपनी हेड पंकज मलिक यांनी उपस्थितांना सुरक्षते संदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन योगेश वासनिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रफुल्ल म्हात्रे यांनी व्यक्त केले.







