रेवदंडा मित्र मंडळातर्फे २९ सप्टेंबरला ‘रेवदंड्याचा राजा’ गणेशोत्सव
रेवदंडा मित्र मंडळातर्फे २९ सप्टेंबरला ‘रेवदंड्याचा राजा’ गणेशोत्सव
रेवदंडा : प्रतिनिधी
रेवदंडा मित्र मंडळाच्या वतीने यंदाही ‘साखरचौथ गणेशोत्सव – रेवदंड्याचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, बुधवार ३० सप्टेंबर रोजी विसर्जन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी गणेशमूर्ती स्थापना, पूजा व आरती तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी भक्तांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘भव्य आगमन रॅली’ काढण्यात येणार आहे. श्री शारदा पेट्रोल पंप येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे.
बुधवारी गणरायाच्या विसर्जनाचा सोहळा पार पडणार असून, ढोलपथकाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या उत्सवात परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गणरायाचे दर्शन घ्यावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन रेवदंडा मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.
स्थळ : रेवदंडा भैरवनाथ मंदिर, रेवदंडा हायस्कूलसमोर.




