चौलच्या श्री सद्गुरू पतसंस्थेचा सामाजीक उपक्रम चौलच्या लिलाश्री सहजीवन वृध्दाश्रमास निधी सुर्पूद
चौलच्या श्री सद्गुरू पतसंस्थेचा सामाजीक उपक्रम
चौलच्या लिलाश्री सहजीवन वृध्दाश्रमास निधी सुर्पूद
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौलच्या श्री सद्गुरू पतसंस्थेने स्थानिक लिलाश्री सहजीवन वृध्दाश्रमास निधी सुर्पूद करून सामाजिक बांधिलकी जोपासली, श्री सद्गुरू पतसंस्थेचे आर्थिक उलाढालीचा व्यवसाय करत असताना, सामाजीक बांधिलकीतून करत असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.
चौल श्री सद्गुरू ग्रामीण पतसंस्था चेअरमन प्रविण राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे कार्यरत आहे. पतसंस्थेने स्वतःचे व्यावसायीक स्थान मजबून करत, सभासदासह जनतेचा विश्वास संपादन केला आहे. चौल श्री सद्गुरू पतसंस्थेच्या माध्यमातून चेअरमन प्रविण राऊत यांच्या संकल्पनेतून निर्मल गणेश साई कल्याण निधी योजनेअंतर्गत गरजूना मदत निधी दिली जाते, त्यामधून यावर्षी चौल मध्ये क्रियाशील असलेल्या लिलाश्री सहजीवन वृध्दाश्रमास रूपये 12 हजार निधीची मंजूर करण्यात आला.
चौल मधील लिलाश्री सहजीवन वृध्दाश्रमास चेअरमन प्रविण राऊत यांच्या सुचनेनुसार श्री सद्गुरू पतसंस्थेचे सचिन असिफ किरकिरे, संचालक प्रथमेश राऊत व इतर यांनी प्रत्यक्ष भेट दिली व लिलाश्री सहजीवन वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक प्रमोद हरिश्चंद्र हर्डिकर यांना 12 हजार रूपयांचा धनादेश सुर्पूद केला. यावेळी लिलाश्री सहजीवन वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक प्रमोद हरिश्चंद्र हर्डिकर यांनी चेअरमन प्रविण राऊत व पतसंस्थेचे कार्यकारी संचालक यांचे आभार व्यक्त केले.
