ताज्याघडामोडी

पेझारी येथे नवजीवन क्रिडा मंडळाच्या सभागृह शेडचे लोकार्पण उत्साहात

पेझारी येथे नवजीवन क्रिडा मंडळाच्या सभागृह शेडचे लोकार्पण उत्साहात
विभागातील विकासाची कामे निश्चितपणे मार्गी लागतील – जि.प.सदस्य दिलिप (छोटमंशेठ)भोईर यांची ग्वाही
रेवदंडा : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे नवजीवन क्रिडा मंडळ व महिला मंडळाच्या सभागृह शेडचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम उत्साहात पार पडला, यावेळी उपस्थितांनामार्गदर्शन करताना, विभागातील विकासाची कामे निश्चितपणे मार्गी लागतील अशी ग्वाही जि.प.सदस्य दिलिप (छोटमंशेठ) भोईर यांनी दिली.
पेझारी येथील नवजीवन क्रिडा मंडळाच्या सभागृह शेड लोकार्पण सोहळा कार्यक्रम रविवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजीत करण्यात आला होता. प्रसंगी अलिबाग-मुरूड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थितीसह शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, माजी समाजकल्याण्ा सभापती व विदयमान िज.प.सदस्य दिलिप (छोटमंशेठ)भोईर, सभापती भाग्यता पाटील आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.
प्रारंभी आमदार महेंद्र दळवी व इतर मान्यवर मंडळी यांचे शुभहस्ते फित कापून व फित कापून नुतन नवजीवन क्रिडा मंडळाच्या सभागृह शेडचे शुभारंभ करण्यात आले. पुढील कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी कार्यक्रम स्थळावरून प्रस्थान केल्याने, शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजा केणी यांचेसह िज.प.सदस्य दिलिप (छोटमंशेठ)भोईर, अलिबाग पंचायत समिती सभापती भाग्यता पाटील यांचे हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
पेझारी येथील नवजीवन क्रिडा मंडळ व महिला मंडळाच्या सभागृहास यावर्षी 54 वर्षे पुर्ण झाली आहेत, या सभागृहात मंडळाचे माध्यमातून नित्याने विविध समाजीक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. मंडळाच्या सदस्यांनी सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह शेडची आवश्यकता होती, या मागणीचे दखल घेऊन िज.प.सदस्य दिलिप (छोटमंशेठ)भोईर यांनी सभागृह शेडचे काम मार्गी लावले, नव्याने उभारलेल्या सभागृह शेडमुळे मंडळाच्या विविध सामाजीक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अधिक चांगली सुविधा निर्माण झाली आहे. या प्रसंगी नवजीवन क्रिडा मंडळ व महिला मंडळाचे वतीने उपस्थ्ाित शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजा केणी, िज.प.सदस्य दिलिप (छोटमंशेठ)भोईर, व सभापती भाग्यता पाटील व अन्य मान्यवर उपस्थित यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून यथोचीत सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सभापती भाग्यता पाटील यांनी नवजीवन क्रिडा मंडळ व महिला मंडळाच्या सभागृहास िज.प.सदस्य दिलिप (छोटमंशेठ)भोईर यांनी सभागृह शेडसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले, तर शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी विभागातील विकास कामाची पुर्तता निश्चित केली जाईल असे सांगितले, यापुढे जिल्हा परिषद सदस्य िज.प.सदस्य दिलिप (छोटमंशेठ)भोईर यांनी जि.प.सभापती रसिका राजा केणी व पंचायत समिती सभापती भाग्यता पाटील यांच्या माध्यमातून विभागातील विकासाची कामे निश्चितपणे मार्गी लागतील अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमांस नवजीवन क्रिडा मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, शिवसेना युवासेना तालुका प्रमुख नंदन पाटील, सोशल मिडिया प्रमुख प्रतिक पाटील, सामाजीक कार्यकर्ते नयन पाटील, राजेश पाटील, चेतन पाटील, सागर पाटील, रविंद्र म्हात्रे, चित्रांग पाटील, ॲडव्होकेट रोहीत भोईर आदी मान्यवर मंडळीसह मोठया संख्येने मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *