निवडणुकपुर्व धमाका, काविर जि.प.गटात शेकापक्षाला खिंडार, रामराज भगवेमय

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;
रामराजचे सुभाषशेठ वागळे व मल्याणचे सुभाष पाटील यांच्या समर्थकासह शिवसेनेत पक्ष प्रवेश
रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यातील काविर जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात शेकापक्षाला खिंडार पाडून निवडणूकपुर्व धमाका शिवसेनेने केला. रामराजचे शेकापक्षाचे स्थानिक नेतृत्व सुभाषशेठ वागळे व मल्याण शेकापक्षाचे सुभाष पाटील या हुकमी एक्कानी शिवसेनेत पक्ष प्रवेश समर्थकासह घेतला. विशेषतः सुभाषशेठ वागळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वाडीवस्त्या व गावाने शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने रामराजसह पंचक्रोशी भगवेमय झाली.
रामराज शिवसेना शिंदे गटाचे वतीने येथील बाजारपेठेत 23 जानेवारी रोजी सायकांळी सात वाजता पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थितीसह काविर जिल्हा परिषद शिवसेना उमेदवार अनंत गोंधळी, काविर पंचायत समिती उमेदवार संतोष निगडे, रामराज पंचायत समिती गण उमेदवार तृषा अरूण भगत, माजी जि.प.सदस्य बाळाशेठ तेलंगे, खजिनदार सुरेश म्हात्रे,उपतालुका प्रमुख अरूण भगत,संदेश पालकर, अँड महेश शिंदे, सुधीर चेरकर, पुथ्वीराज पाटील, जनार्दन भगत, युवासेना प्रमुख अजय गायकर, जीवन म्हात्रे, जगदीश गायकर, अनिल शेळके, स्मिता शेळके, बाबुराव पाटील, विशेष चोरगे, कृष्णा पाटील, उल्हास चाचड, सुरेश मढवी, प्रकाश पाटील, मेघश्याम झावरे, भाउ शेळके,रसिक पाटील, मोहन झावरे, भरत कोकबनकर, केतन पुनकर, धर्मा लोभी, मधू पारधी, प्रतिभा पाटील, जीवन पाटील,नंदू तांबडकर, रमेश पाटील, आदीची उपस्थिती होती,
या पक्ष्ा प्रवेश कार्यक्रमांत रामराज विभागातील शेकापक्षाचे सुभाषशेठ वागळे, त्यांची पत्नी मनिषा वागळे, मुलगा सोहम वागळे, मल्याण येथील शेकापक्षाचे प्रमुख कार्यकर्ते सुभाष पाटील, नवखार येथील नितिन पालकर, अर्चना पालकर,गजानन दिवकर, अभिषेक म्हात्रे, कैलास वेटकोळी,गणेश धुमाळ,खेळया वारगुंडे, योगेश काष्टे,पंढरीनाथ भांडविलकर, निलेश भांडविलकर, रवि सावंत, संदिप कदम, प्रमोद पुनकर, प्रदिप कदम, समीर राणे, चंद्रकांत सावंत, तसेच रामराज कोळीवाडा, रामराज मराठी आळी,उमटे डुंगी, महानवाडी, पिंपळवाडी, खैरवाडी, निर्मिर्डे, निवासवाडी, जांभूळवाडी, बापळे, नांगरवाडी, नवघर, रायशेत, राजेवाडी, येथील मोठया संख्येने ग्रामस्थ व महिला यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी रामराजचे सुभाषशेठ वागळे, मनिषा वागळे, सोहम वागळे व मल्याणचे सुभाष पाटील आदीचे शिवसेना पक्षात आमदार महेंद्र दळवी यांनी पुष्पगूच्छ प्रदान करून व भगवी शाल परिधान करून केले. या पक्ष प्रवेश माजी जि.प.सदस्य बाळाशेठ तेलंगे, उपतालुका प्रमुख अरूण भगत, संदेश पालकर, युवासेना प्रमुख अजय गायकर, आदीच्या प्रयत्नातून झाला.
या प्रसंगी जिल्हा परिषद निवडणूकीनंतर सांबरकुंड धरणाचे भुमिपुजन कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचें हस्ते करण्याचा मनोदय व्यक्त करून येथे स्थानिकांना रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल असे सांगून रोहा एमआयडिसी प्रमाणे अलिबाग तालुक्यात सुध्दा एमआयडिसी साठी प्रयत्नशील असल्याचे सुतोवाच आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांना संबोधीताना केले तर यावेळी काविर जि.प. उमेदवार अनंत गोंधळी, काविर पंचायत समिती उमेदवार संतोष चंद्रकांत निगडे, रामराज पंचायत समिती उमेदवार तृषा अरूण भगत यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश पालकर यांनी केले तर धर्मा लोभी, बाळाशेठ तेलंगे, सुभाषशेठ वागळे, सोहम वागळे, आदीने उपस्थितांना संबोधीत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अँड महेश शिंदे व निलेश पाटील यांनी केले तर कार्यक्रमांची सांगता अरूण भगत यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून केले, सुरूवातीस मान्यवर उपस्थितांचे हस्ते दिपप्रज्वलन तसेच शिवप्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून करण्यात आली.







