चौल जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात भाजपची विजयांची रणनिती

चौल जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात भाजपची विजयांची रणनिती
रेवदंडा-महेंद्र खैरे-जिल्हा परिषदेत महायुती तुटल्याने चौल जिल्हा परिषद गटात व गणातील दोन जागा भाजप स्वबळावर स्वतंत्र निवडणूक लढवित असून विजयाची रणनिती आखून भाजप कार्यकर्ते मोठया जोमाने प्रचारास लागले आहेत.
चौल जिल्हा परिषद गटातून संकेत जोशी हे भाजपचे निष्ठावान जुने कार्यकर्ते निवडणूक लढवित आहेत तर नागाव गणातून भाजपचे जेष्ठ पदाधिकारी उदय काठे हे निवडणूक लढवित आहेत. या पुर्वी उदय काठे या नागाव गणातून उदय काठे व त्यांची धर्मपत्नी सरिता काठे हे एक एक वेळा निवडून गेले आहेत. भाजपने पुनस्यः उदय काठे यांचेवर विश्वास ठेवीत नागाव पंचायत समिती गणात उमेदवारी दिली आहे. तसेच चौल मधून भाजपचे वतीने संदिप घरत हे निवडणूक लढवित आहेत. या चौल पंचायत समिती गणातून संदिप घरत हे शेकापक्षातून निवडून गेले आहेत, त्यावेळी त्यांनी अलिबाग पंचायत समिती मध्ये उपसभापती म्हणून कार्यभार सुध्दा सांभाळला आहे.
मात्र भाजप स्वबळावर चौल जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात निवडणूक लढवित आहे, यापुर्वी भाजपची ताकद चौल जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात नगण्य होती, परंतू गेल्या एक दोन वर्षात भाजप पक्षात सुध्दा विविध पक्षातील अनेक मातब्बर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश केल्याने भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे. विशेषतः थेरोंडयाचे माणिक बळी, तसेच रेवदंडा मधील राजन वाडकर, तसेच चौल मधून संदिप घरत या कार्यक्षम व राजकीय वर्चस्व असलेल्या कार्यकर्त्यानी भाजप पक्षात प्रवेश घेतल्याने भाजपची ताकद थेरोंडा व रेवदंडा विभागात निश्चित वाढली आहे. या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजपचे वतीने निश्चितपणे विरोधकांना आव्हान निर्माण करणार आहेत.
या जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये भाजप कार्यकर्ते उमेदवारासह मतदाराच्या घरोघरी जाउन प्रचार करत आहेत, व दिल्लीत भाजप, राज्यात भाजप तसेच जिल्हात भाजप हा नारा देत, भाजपच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करत आहेत. यामध्ये भाजप जिल्हा पदाधिकारी हेमंत दांडेकर, भाजप जिल्हा परिषद उमेदवार संकेत जोशी, पंचायत गण उमेदवार उदय काठे व संदिप घरत तसेच माणिक बळी, राजन वाडकर, प्रकाश दांडेकर तसेच थेरोंडा येथील कार्यकर्ते मोठया उत्साहाने प्रचारात सहभागी झालेले दिसून येतात.







