ताज्याघडामोडी

शिवसेनेच्ाा चेहेर येथे प्रचाराचा शुभारंभ

शिवसेनेच्ाा चेहेर येथे प्रचाराचा शुभारंभ
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यातील कोर्लई जिल्हा परिषद गट, कोर्लई पंचायत समिती गण व बोर्ली पंचायत समिती गण निवडणुक प्रचाराचा शुभारंभ चेहेर येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचे प्रांगणात शनिवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता श्रीफळ वाढवून करण्यात आला.
कोर्लई जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसामान्य महिला उमेदवार असून भोईघर येथील शिवसेनेनेच्या ज्योती रमेश नांदगावकर या निवडणूक लढवित आहेत, तर कोर्लई पंचायत समिती गणात चेहेर येथील स्वाती आशिष चवरकर तसेच बोर्ली पंचायत समिती गणात बारशीव येथील निलेश शांताराम घाटवळ हे निवडणूक लढवित आहेत.
चेहेर येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचे प्रांगणात चेहेर येथील जेष्ठ नागरिक यांचे हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीफळ वाढविण्यात आला, तत्पुर्वी कोर्लई गट जिल्हा परिषद उमेदवार ज्योती रमेश नागावकर, कोर्लई गण पंचायत समिती उमेदवार स्वाती आशिष चवरकर व बोर्ली गण निलेश शांताराम घाटवळ यांनी पुजाअर्चा केली, प्रारंभी विठ्ठल रखुमाई मंदिरात पुजाअर्चा निवडणूक उमेदवाराचे हस्ते करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोसे, रमेश उर्फ बाबू नागावकर,सि.एम.ठाकूर, शिवसेना उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, शिवसेना युवासेना मुरूड तालुका प्रमुख अमोल लाड, चंद्रकांत मोहिते, माजी सरपंच मांडळा सुचिता पालवणकर, माजी सरंपच मांडळा साक्षी गायकवाड, माजी सरपंच मांडळा शैलेश रातवडकर, तळेखार माजी सरपंच निर्मला म्हात्रे, तसेच चेहेर ग्रामस्थ व महिला यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
प्रसंगी कोर्लई जिल्हा परिषद गटात आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा निधी उपलब्ध करून येथील सर्वागिण विकासाला योगदान दिले आहे. या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत आमदार महेंद्र दळवी यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे कोर्लई गट जिल्हा परिषद उमेदवार ज्योती रमेश नागावकर, कोर्लई पंचायत समिती गण उमेदवार स्वाती आशिष चवरकर, तसेच बोर्ली पंचायत समिती गण उमेदवार निलेश शांताराम घाटवळ यांनी बहूमताने निवडून दयावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोसे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *