ताज्याघडामोडी

चौल जिल्हा परिषद निवडणूकीत मध्ये नळपाणी पुरवठा योजनेत भष्ट्राचाराचा आरोप

पावणे तिन कोटीचे बिल निघाले, पण एक थेंब पाणी जनतेला मिळाले नाही- आमदार महेंद्र दळवी
रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडा पारनाका येथे शिवसेनेच्या चौल रायगड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण उमेदवाराचे प्रचारार्थ प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत चौल नळपाणी योजनेत भष्ट्राचार विरोधी पक्षाच्या उमेदवाराने केल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी करून लवकरच याबाबत चौकशी होईल व आरोप सिध्द होईल, मात्र पावणे तिन तिन कोटी रूपयांचे कामाचे बिल निघाले, परंतू अदयापी एक थेंब पाणी येथील जनतेला मिळाले नसल्याची खंत आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली. या सभेत त्यांनी जिल्हा परिषद निवडणूकीत महायुतीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला येथील स्थानिक नेत्यानी सहकार्य न दिल्याने महायुती तुटली असल्याचा आरोप सुध्दा केला.
रेवदंडा पारनाका येथे शिवसेनेच्या चौल गट जिल्हा परिषद व पंचायत गण निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन बुधवार दि. 4 जानेवारी रोजी सायकांळी सात वाजता करण्यात आले होते. या सभेत आमदार महेंद्र दळवी यांनी चौल जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण उमेदवाराच्या प्रचारार्थ उपस्थितांना विजयाच्या आवाहनासाठी भाषण केले. यावेळी व्यासपिठावर शिवसेनेचे चौल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डाँ. सचिन राउळ, तसेच नागाव पंचायत समिती गण उमेदवार शरद गोंधळी व चौल पंचायत समिती गण उमेदवार अंकिता अंकुश घरत यांच्या उपस्थितीसह सरपंच रेवदंडा प्रफुल्ल मोरे, शिवसेनेच्या रणरागिणी जितेश्री अर्जुन पाटील आदीची उपस्थिती व्यासपिठावर होती.
शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात मार्गी लावली आहेत, रेवदंडा-अलिबाग रस्ता, रेवदंडा पुल, सांबरकुंड धरण, आदी अनेक हजारो कोटीची कामे अलिबाग तालुक्यात आणली आहेत व या भागातील सर्वागिण विकास करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले. कार्यकर्त्यानी आपआपसातील मतभेद दुर ठेवल्यास ही निवडणूक विकास कामाच्या जोरावर सोपी व एकहाती असेल, असेही म्हटले. परिसरातील सर्वागिण विकासासाठी विशेष निधीची उपलब्ध केल्याचेही त्यांनी म्हटले. जिल्हा परिषद निवडणूकीत महायुतीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला येथील स्थानिक नेत्यानी सहकार्य न दिल्याने महायुती तुटली असल्याचा आरोप सुध्दा केला. तसेच यावेळी त्यांनी चौल मध्ये पाणी प्रश्न गहन झाला आहे. चौल नळपाणी योजनेत भष्ट्राचार विरोधी पक्षाच्या उमेदवाराने केल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी करून लवकरच याबाबत चौकशी होईल व आरोप सिध्द होईल, मात्र पावणे तिन तिन कोटी रूपयांचे कामाचे बिल निघाले, परंतू अदयापी एक थेंब पाणी येथील जनतेला मिळाले नसल्याची खंत आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली. यावेळी चौल जिल्हा परिषद गट उमेदवार डाँ. सचिन राउळ, नागाव पंचायत समिती गण उमेदवार शरद गोंधळी,व चौल पंचायत समिती गण उमेदवार अंकिता अंकुश घरत हे सुयोग्य उमेदवार दिले असून त्यांना येणाऱ्या 7 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या निवडणूकीत बहुमताने निवडून दयावे असे आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी प्रचारार्थ भाषणात केले. तत्पुवी शिवसेनेच्या नेत्या जितेश्री अर्जुन पाटील यांनी प्रथम उपस्थितांना मार्गदर्शन करताना, माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख कै. विष्णू आचरेकरांचे स्मरण उपस्थितांना केली, व ज्यांनी त्यांचा घात केला, त्याच सोबत युती करून गळयात गळे घालत असल्याचा भावनिक आक्रोश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *