ताज्याघडामोडी

शेकापक्षाचा 40 वर्षाच्या बालेकिल्लाचा बुरूज ढासलला

रेवदंडयातील मोठा कोळीवाडा मध्ये शिवसेनेचा सुरूंग
शेकापक्षाचा 40 वर्षाच्या बालेकिल्लाचा बुरूज ढासलला
ग्रा.प.सदस्या जयश्री पाटीलसह मोठा कोळीवाडा ग्रामस्थ व महिलांचा शिवसेना पक्षात प्रवेश
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडा मोठा कोळीवाडयातील ग्रा.प.सदस्या जयश्री पाटीलसह मोठया संख्येने ग्रामस्थ तसेच महिलांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने, रेवदंडा शेकापक्षाला 40 वर्षाचा पांठिबा असलेला मोठा कोळीवाडयाचे रूपाने बुरूज ढासलला असून पुनस्यःरेवदंडा शेकापक्षास शिवसेनेने सुरूंग लावून खिंडार पाडले.
रेवदंडा मोठा कोळीवाडा येथील खंडोबा मंदिरातील सभागृहात पालखी उत्सवाच्या पुर्वसंध्येला मोठया संख्येने ग्रामस्थ्ा व महिला यांचा शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरूवार दि. 29 जानेवारी रोजी सायकांळी साडेसहा वाजता संपन्न झाला. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद गट उमेदवार डाँ.सचिन राउळ, पंचायत समिती गण उमेदवार शरद गोंधळी, तसेच रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्ल मोरे, अजीत पाटील, बोर्ली ग्रा.प.सरपंच सपना जायपाटील, तसेच ग्रामपंचायत रेवदंडा सदस्य सुराराम माळी,हर्षल घरत,योगेश पिटनाईक,राकेश मानाजी, दुशांत झावरे, भारती मोरे,जोऐल उंदीर, संकेत भाटकर, सदस्या लिना मानकर, शलाका राउत, तनुजा मोरे, भुषण मोरे,ताराचंद कोंडे, रोशन भोईर,किशोर मानकर, सुभाष शेळके, केदार खोत तसेच रेवदंडा ग्रा.प.सदस्य व सदस्या यांचेसह मोठया संख्येने शिवसेनेचे कार्यकर्त्याची उपस्थिती होती. यावेळी मोठया संख्येने कोळीवाडा ग्रामस्थ व महिला यांची उपस्थित होते.या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागत ग्रा.प.सदस्या जयश्री पाटील, अजीत पाटील यांनी तसेच मोठा कोळीवाडा ग्रामस्थ यांचे वतीने आमदार महेंद्र दळवी व उपस्थित मान्यवर यांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. तद्नंतर आमदार महेंद्र दळवी यांनी ग्रा.प.सदस्या जयश्री पाटील, अजीत पाटील यांचे तसेच शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून शिवसेना पक्षात स्वागत केले. यावेळी मोठा कोळीवाडा येथील विठोबा बनिया, चित्रा बनिया, ताराबाई पाटील, गाव पाटील महेश पाटील, सुचिता पाटील, जनीबाई मायपाटील, सचिन पाटील, स्वप्नाली पाटील, चंद्रा पाटील, भरत पाटील, रंजिता पाटील, केतन उंदीर, बिपीन बनिया, मित बनिया, लक्ष्मी पाटील, वेदांत पाटील, उदय पाटील, सुनिता पाटील, शांताबाई बोबडी, विजेता बनिया, पारू बंगळेकर, गणेश बंगळेकर, कविता बनिया, अशोक बनिया, संनिल बनिया, मिनाक्षी बनिया, संतोष गुंडा, शिल्पा गुंडा, आनंद पाटील, रविंद्र बनिया, विजेता बनिया, परशुराम बोबडी, प्रणव बोबडी, प्रमोदिनी बोबडी, आशा रागा, दत्ता रागा, प्रतिभा रागा, बाळकृष्ण रागा आदीचे स्वागत आमदार महेंद्र दळवी यांनी शिवसेना पक्षात भगवी शाल, व पुष्पगूच्छ प्रदान करून केले.
रेवदंडा विभागात शिवसेना पक्षाची घौडदौड चांगली होत असून, पक्ष प्रवेश घेतलेल्या सर्व कार्यकर्त्याचा हिरमोड होणार नाही, यांची ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी दिली. यावेळी त्यांनी शवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद गट उमेदवार डाँ.सचिन राउळ, पंचायत समिती गण उमेदवार शरद गोंधळी यांना बहूमताने निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *