ताज्याघडामोडी

चौल येथील पर्वतवासी श्री दत्‍तात्रयांचे स्वयंभू देवस्थान

चौल येथील पर्वतवासी श्री दत्‍तात्रयांचे स्वयंभू देवस्थान
महेंद्र खैरे, रेवदंडा
नजिकच्या उत्खननाने चौल-रेवदंडा नव्हे चौल चंपावतीनगरी इतिहास शके 800 ते 1200 कालावधीत जोडला गेल्याचे स्पष्ट केले.पौराणिक व्दापारयुगात चौल-रेवदंडाचा उल्‍लेख रेवतीनगर असा लिखित आहे. इतिहासकालात विदेश व्यापारांशी संलग्‍न असलेल्या चौल चंपावतीनगरीत प्रसिध्द अशी 360 मंदिरांची नोंद सापडते. चौल रामेश्‍वर, चौल शितळादेवी, हिगुंळजा देवी, मुखरी गणपती, महालक्ष्मी, चंपावतीदेवी, चौल कुडेंश्‍वर मंदिर, रेवदंडा हरेश्‍वर मंदिर, रेवदंडा मारूती मंदिर आदी मंदिरे अद्यापी इतिहासाची साक्षीदार आहेत, त्यापैकी चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्‍तात्रयांचे स्वयंभू देवस्थान एक आहे.
चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्‍तात्रयांचे स्वयंभू देवस्थान संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथे दत्‍त जयंतीच्या पाच दिवसांचे यात्रेला रायगड जिल्हांसह मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणाहून अंदाजे तिन लाख यात्रेकरू येतात. अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठी व वर्षातील शेवटची यात्रा दत्‍त जयंती उत्सहात साजरी होते.
संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्‍तात्रयांचे स्वयंभू देवस्थान फारसे पुरातन नसल्याचे सांगितले जाते. दत्‍त यात्रे संबधी पुरातन काळातील उल्‍लेख सापडत नाही, मात्र नवनाथाचे सुध्दा येथे वास्तव्य होते असे नवनाथ ग्रंथावरून वाटते. हे मंदिर पुरातन नसले तरी इतिहासीक निश्‍चित आहे. कारण आग्रांच्या उत्‍तरकालीन इतिहासात या दत्‍तमंदिराचा उल्‍लेख वरचेवर आढळतो. तसेच आंग्रे घराण्यातील पुरूषांची या पर्वतवासी दत्‍तावर अतिशय श्रध्दा होती.
पर्वतवासी श्री दत्‍तात्रयांचे स्वयंभू देवस्थानाची मिळणारी माहिती अतिशय मनोरंजक अशीच आहे. इ.स. 1810 च्या मार्च एप्रिल मध्ये डोंगरावर कोणी एक गोसावी राहत होता. त्यांने तिथे एक मठी बांधली. हा गोवावी दत्‍ताची भक्‍ती करीत असे. एक दिवस त्याने दत्‍ताच्या पादुका पुर्वीच्या जागेवरून काढून त्या आपल्या मठीत आणल्या आणि घगरीखाली पुरून ठेवल्या.पुढे 1831 मार्च एप्रिल मध्ये एक पाषाणाची दिपमाळा बांधण्यात आली. 1834 च्या डिसेंबर मध्ये गोविंद वाडकर नावाच्या रेवदंडयाच्या कोळी गृहस्थांने पादुकांच्या भोवताली प्रदक्षिणेची साधी असलेली वाट चुनेगच्चीची केली. तर वर कळस बांधला.1843 मध्ये गणेशभट गुजराथी प्रभासकर यांनी भिक्षा मागून पैसे जमविले आणि मठीचा जीर्णोध्दार केलात्र त्यावर कौलारू मंडप बांधला या ठिकाणी एक फिरता बैरागी वस्तीस आला. त्यांने 1857 च्या नोव्हेंबरमध्ये दत्‍ताची एक पाषाण मुर्ती आणली आणि तिची जुन्या पादुकांजवळ स्थापना केली.
श्री दत्‍तात्रंयाची यात्रा मार्गशिष शुध्द पौणिमेला बश्री दत्‍त जयंतीपासून पाच दिवस रात्रंदिवस यांत्रा भरते व त्यावेळभ् आसमंतातील अडीच ते तिन लाख लोक सामील होतात. या यात्रेत लाखो रूपयांची उलाढाला होते या यात्रेचे खास वैशिष्टे म्हणजे तेथे श्री दत्‍तात्रयांच्या मुर्तीवरून कोंबडी ओंवाळून टाकली जात असे व ती इतर लोक पकडून घेऊन जात असत, मात्र काळाचे ओघात ही प्रथा बंद झाल्याचे ऐकिवात येते.
या शिवाय दर गुरूवारी सुध्दा भक्‍तगण बहुसंख्येने दत्‍त दर्शनास येतात. तसेच सहलीला येणारे पर्यटक सुध्दा श्री दत्‍तात्रयांचे दर्शन घेतात. हा दत्‍त नवसाला पावतो व त्याच्या दर्शनाने अडीअडचणीचे निवारण होते अशी लोकांची श्रध्दा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी या नगरीतील पाइारे क्षत्रिय पाचकळशी समाजापैकी मुंबईत राहणा-या मंडळीनी सुमारे 40 ते 60 वर्षापुर्वी तयार केलेला चांदिचा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून वाजतगाजत तो दत्‍त मंदिरात आणला जातो. आणि मुळ दत्‍तमूर्तीची यथासांग पुजा करून हा मुखवटा मुळ दत्‍तमुर्तीला लावतात. यात्रेपुर्वी या श्री दत्‍त मंदिरात सात दिवस सप्ताह चालतो हो हरेराम बुवा या संताने चालू केला होतात्र या सप्ताहात आंदोशी गावापासून रामराज पर्यत साधारणतः 19 गावे सहभाग घेतात. हा सप्ताह रात्रंदिवस यात्रेदरम्यान सुरू असतो.
या मंदिराचे टेकडीकडे जाताना वाटेत अनेक मंदिरे लागतात. राममंदिर,जाखमाता मंदिर,थोडे पुढे गेल्यावर टेकडीवरि जीर्ण गोल देऊळ आहे हे मंदिर एकतर नाथापैकी पिंगळा सतीचे देऊळ असावे या देवतेचे नावावरूनच समोरच्या तळयाला भोवाळे हे नाव पडले असावे. तळे संपते ताचे समोर दिसते ते भोवाळे गाव. याच गावाजळव चौलनाका ते वावे या मुख्य रस्तावर डावीकडे जो मार्ग जातो तो दत्‍त मंदिराकडे. दत्‍त मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता डांबरीकरणाचा आहे वाहनेसुध्दा पाय-यांपर्यत जातात. सुरूवातीला दत्‍तमंदिराकडे जाताना उजवीकडे एक मुरलीधरांचे देऊळ आहे. या धर्मशाळेमध्ये पुर्वी प्राथमिक शाळेचे वर्ग भरायचे मात्र सद्या ही धर्मशाळा पडिक आहे,
दत्‍त मंदिराकडे जाताना लागणा-या पाय-या सहाफुट रूंद आहेत या पाय-या कोणी नवसाच्या किंवा स्मरणार्थ अशा पाच सहा दहा बांधल्या आहेत. तेथेच त्यांचा शिलालेखही आहेत अंदाजे एकूण सातशे पाय-या दत्‍त मंदिराकडे जाताना असाव्यात असे सांगितले जाते. येथून पुढे अर्ध्या पाय-या चढून गेल्यावर डाव्या बाजूला अक्‍कलकोट येथील श्री स्वामी समर्थाचा मठ आहे. येथूनच पुढे बुरांडे महाराज समाधी मंदिर आहे व तेथून थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूला नवनाथ संप्रदायांचा नवनाथ दरबार आहे. श्री दत्‍तात्रयेंच्या मंदिराजवळून जाताना आजूबाजूस पाहिल्यावर मन हरवून जाते. पुर्वेस लांब लांब परिसरात डोंगराच्या रागा येथेच टेकडीच्या पायथ्याशी हनुमानपाडा त्युपढे गेल्यावर खिडीत एक पुरातन दोन घुमटाचे सुंदर सोमेश्‍वर मंदिर आहे त्याचं मंदिराच्या समोरील डोगराच्या माथ्यावर पुरातन खडकात खोदलेले वाघेश्‍वरी देवीचे देऊळ आहे तेथूनच आजूबाजूची शोभा रमणीय दिसते. मात्र मंदिरापर्यत जाण्यासाठी पाय-या नाहीत. श्री दत्‍त मंदिराच्या पाठीमागे म्हणजे पश्‍चिमेला चौल व रेवदंडा, अलिबाग तालुक्यास जोडणारा रेवदंडा पुल, कोर्लईचा किल्‍ला, कुंडलिका खाडी, वेलस्पुन कंपनी साळाव व अफाट अरबी सागर डोळयांचे पारणे फेडणारे दृश येथून दिसते.श्री दत्‍त मंदिराचे दक्षिणेला खाली उतरले की लगेचच माई जानकीबाई हनुमानदास मठ लागतो. ही जानकीबाई नावाच्या माई मठी आहे. या मठीत रामलक्ष्मणाची जुनी मुर्ती आहे .त्यांनतर मठीचा जिर्णोध्दार कृष्णदास बाबानी केला. सध्या मठात ब-याच मुर्ती पहावयास मिळतात येथून पायवाटेने खाली उतरले की हिगुंळजा देवीचे मंदिर आहे. येथे आपणांस बुध्द लेणी पहावयास मिळतात. हे मंदिर पांडवकालीन असल्याचा उल्‍लेख लिखीत सापडतो. हिंगुळजा देवीच्या मंदिराला लागूनच अन्नपुर्णा देवीचे आत गुंफेत स्थान आहे तेथे साधुना तपाला बसण्यासाठी ब-यांच कोठडया आहेत पहिल्याच कोठडीत एक निशाणी आहे ती गुप्तमार्गाची असावी असे म्हणतात. या टेकडीवरून आजूबाजूच्या सृष्टी सौदर्याचा आस्वाद घेता येतो. तेव्हा माणूस नकळत हात जोडून नतमस्तक होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *