ताज्याघडामोडी

नागाव येथे श्री सत्यसाई बाबांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

नागाव येथे श्री सत्यसाई बाबांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
रेवदंडा-महेंद्र खैरे- भगवान श्री सत्यसाई बाबांचा जन्मोत्सव सोहळा सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी नागाव येथील साईनगर, खार गल्ली परिसरातील ‘प्रशांती निवास’ येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पहाटे ५ वाजता ओंकारम व सुप्रभातमने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर नगरसंकीर्तन, जन्मोत्सव सोहळा, भजन व आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री सत्यसाई बाबांचे दर्शन घेतले. यानंतर तीर्थप्रसाद व अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.
जन्मोत्सवानिमित्त दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत परहूर पाडा, अलिबाग येथील नारायण सेवा वृद्धाश्रमात सेवा उपक्रम राबविण्यात आला. तसेच श्री साई नेत्रालयाच्या वतीने नेहमीप्रमाणे नेत्रतपासणी व मोफत नेत्रशस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्यात आली. रात्री स्थानिक भजन व आरतीने या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन अलिबाग, खारगल्ली, नागाव, चौल, रेवदंडा व थेरोंडा येथील सत्यसाई भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील साईभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *