ताज्याघडामोडी

रामराज येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

रामराज येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
रेवदंडा / प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील रामराज येथे घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षे ६ महिने वयाची मुलगी रामराज, ता. अलिबाग येथील राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या अल्पवयीनपणाचा फायदा घेत अज्ञात इसमाने तिला फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुरनं. १५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *