रेवदंडयातील नुतन मच्छी मार्केटचा शानदार शुभारंभ

रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडयातील नुतन मच्छी मार्केटचा शानदार शुभारंभ कार्यक्रम बुधवार दि. 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता मोठया उत्साहात संपन्न झाला. या शुभारंभ कार्यक्रमाचे नियोजन रेवदंडा ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात आले होते.
यावेळी चौल गण जिल्हा परिषद सदस्य डाँ.सचिन राउळ, रेवदंडा गट पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी तसेच रेवदंडा ग्रा.प. सरपंच प्रफुल्ल मोरे, ग्रा.प.सदस्य राजन वाडकर या प्रमुख मान्यवरासह ग्रा.प.सदस्य खलिल तांडेल, ग्रा.प.सदस्य सुराराम माळी,कोळी समाज नेते ज्ञानेश्वर टिवळेकर,ताराचंद कोंडे,गोरखनाथ नवरीकर, शिवसेना शिंदे गट युवासेना सदस्य हर्षल घरत, रेवदंडा शिवसेना शहर प्रमुख योगेश पिटनाईक, नवनीत मेस्त्री, गजानन झेडेकर, किशोर मानकर, संतोष कोंडे, सामाजीक कार्यकर्ते राजू चुनेकर, रेवदंडा महिला शहर अध्यक्ष शलाका राउत, थेरोंडा कोळी समाज कमिटी सदस्य तसेच मोठया संख्येने रेवदंडा-थेरोंडा ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवर जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ व पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, राजन वाडकर,खलिल तांडेल, ज्ञानेश्वर टिवळेकर, ताराचंद कोंडे, आदी उपस्थ्ाित मान्यवरांचे स्वागत सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी केले. यावेळी रेवदंडा ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून नुतन मच्छी मार्केटचा शुभारंभ करण्यात आला. सदर नुतन मच्छी मार्केट आमदार महेंद्र दळवी यांचे निधीतून थेरोंडा-रेवदंडा ग्रामस्थांचे मागणीने बांधण्यात आले आहे. रेवदंडा को.ए.सो. हायस्कुल मार्गे समुद्र किनारी जात असलेल्या रस्ताच्या कडेला नुतन मच्छी मार्केट बांधण्यात आले आहे.


