उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या अथक प्रयत्नाने उमटे धरणाची राजिप पाणी पुरवठा अभियंता व लोकप्रतिनिधी यांनी केली पहाणी

उमटे धरणाची राजिप पाणी पुरवठा अभियंता व लोकप्रतिनिधी यांनी केली पहाणी
निधी कागदोपत्री खर्च, पण प्रत्यक्षात खर्च नाही-जि.प.सदस्य अनंत गोंधळी स्पष्टीकरण
रेवदंडा-महेंद्र खैरे-गेले अनेक वर्ष उमटे धरण गाळमुक्त व्हावे म्हणून उमटे धरण संघर्ष ग्रुप अथक परिश्रम घेत आहेत, त्याच्या प्रयत्नानेच स्थानिक लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी उमटे धरणाची प्रत्यक्ष पहाणी केली. परिसरात अनेक वर्षे पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे, हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित प्रयत्नशील आहे. मात्र उमटे धरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनाच्या निधीचा खर्च कागदौपत्रीच,मात्र खर्च प्रत्यक्षात केला गेला नाही असा आरोप नवनिर्वाचीत जि.प.सदस्य अनंत गोंधळी यांनी केला.
उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या अथक प्रयत्नानंतर उमटे धरणाची पहाणी राजिप पाणी पुरवठा अभियंता मोहन सरोदे याच्यासह नवनिर्वाचीत जि.प.सदस्य अनंत गोंधळी, प.स.सदस्य संतोष्ा निगडे यांनी केली यावेळी उमटे धरण संघर्ष समिती अध्यक्ष अँड राकेश पाटील, नंदेश गांवड तसेच पंचक्रोशी ग्रामस्थ मंडळी यांची उपस्थिती होती.
यावेळी राजिप पाणी पुरवठा अभियंता मोहन सरोदे यांनी उमटे धरणाची प्रत्यक्ष पहाणी करताना, येथील गाळ काढणे का ? गरजेचे आहे, तसेच येत्या पंधरा दिवसात सामाजीक स्तरावर, व विविध कंपनीच्या माध्यमातून गाळ काढावे असे संघर्ष समितीचे वतीने अँड राकेश पाटील यांनी म्हटले, या बाबीवर सखोल चर्चा येथे करण्यात आली.
या प्रसंगी उमटे धरणाचे गढूळ पाणी समस्या ही गंभीर स्वरूपाची असल्याचे जि.प.सदस्य अनंत गोंधळी यांनी राजिप अभियंता मोहन सरोदे यांचे निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी येथील पाणी शुध्दीकरण जॅकवेल बंद असल्याचे सांगितले. स्थानिक पाण्यासाठी वणवण करत असून लोकप्रतिनिधी म्हणून उमटे धरण पाणी प्रश्न जिल्हा परिषदेत लावून धरणार असल्याचे सांगितले. तसेच आमदार महेंद्र दळवी यांनी लवकरच सांबरकुंड धरणाचा मार्ग सुकर होईल असे म्हटल्याचे त्यांनी सुतोवाच केले. यावेळी त्यांनी मात्र उमटे धरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनाच्या निधीचा खर्च कागदौपत्रीच,मात्र खर्च प्रत्यक्षात केला गेला नाही असा आरोप केला. तर उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी सामाजीक स्तरावर व विविध कंपनीच्या माध्यमातून अँड राकेश पाटील यांचेसह प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी राजिप पाणी पुरवठा अभियंता मोहन सरोदे यांनी उमटे धरणासाठी जुन्या योजना राबविण्यात येत आहेत. उमटे धरणाचा पाणी प्रश्न सुरळीत होण्यासाठी नवीन योजना कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे म्हटले. जेणेकरून जॅकवेल, शुध्दीकरण यंत्र आदी कामे नव्याने सुरू होतील.
तसेच उमटे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष अँड राकेश पाटील यांनी उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी सामाजीक स्तरावर प्रयत्न करणे जरूरी आहे, सामाजीक स्तरावर सहकार्य लाभले तर येत्या पंधरा दिवसात उमटे धरणातील गाळ काढता येईल असे सांगितले. उमटे धरणाच्या गाळ काढण्यासाठी व पाणी समस्या दुर करण्यासाठी व उमटे धरणातील गाळ उपसा करण्यासाठी परिसरातील ग्रामपंचायतीकडे 15 व्या वित्त शिल्लक निधीची रक्कम जिल्हा परिषद अथवा संघर्ष समितीकडे सुपूर्द करावी अशी विनंती आवाहन संघर्ष समितीचे अध्यक्ष अँड राकेश पाटील यांनी यावेळी केले. तर उमटे धरण संघर्ष समितीचे कार्यकर्ते नंदेश गांवड यांनी नवनिर्वाचीत लोकप्रतिनिधी जि.प.सदस्य अनंत गोंधळी व पं.स.सदस्य संतोष निगडे तसेच शासकीय अधिकारी यांनी उमटे धरणावर प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली, याबद्दल आभार व्यक्त केले.


