आदिशक्ति अभियानात वाडगांव ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय झेप
आदिशक्ति अभियानात वाडगांव ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय झेप
तालुका व जिल्ह्यात प्रथम क्रमांकानंतर राज्यस्तरीय समितीकडून परीक्षण
रेवदंडा-महेंद्र खैरे- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “आदिशक्ति अभियान” अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव, ता. अलिबाग यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरीय तसेच जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर दि. ०७ मे २०२६ रोजी राज्यस्तरीय समितीने वाडगांव ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांचे परीक्षण केले.
यावेळी कोकण विभागाच्या विभागीय उपआयुक्त श्रीम. सुवर्णा पवार मॅडम तसेच परिविक्षा अधिकारी श्रीम. ओव्हाळ मॅडम यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचा आढावा घेतला. महिला व बाल विकास विभाग, ग्रामविकास, शिक्षण व महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध योजनांची माहिती घेऊन समितीने समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी महिला व बाल विकास अधिकारी रायगड श्रीम. कुचिक मॅडम, पंचायत समिती अलिबाग सभापती सौ. भाग्यता पाटील मॅडम, गटविकास अधिकारी सौ. शर्मिला पाटील मॅडम, पंचायत समिती सदस्य श्री. समाधान वार्डे उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत वाडगांवच्या सरपंच सौ. सारिका गणेश पवार, उपसरपंच श्री. जयेंद्र काशिनाथ भगत, ग्रामपंचायत सदस्य सौ. सरिता जयेंद्र भगत, सौ. निलम नरेश थळे, सौ. रुपाली प्रसाद पाटील, सौ. शुभांगी मंगेश भगत, श्री. सजना विठ्ठू नाईक, श्री. संतोष यशवंत बोले, श्री. प्रसाद प्रभाकर पाटील, पोलीस पाटील श्री. नथुराम गणपत म्हात्रे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. रिना वर्तक यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक शाळा वाडगांवच्या मुख्याध्यापिका श्रीम. सुगंधा पाटील, आशा सेविका सौ. राखी राजेंद्र घाटकर, अंगणवाडी मदतनीस सौ. रिदिमा राजेश बोले यांनीही सहभाग घेतला.
ग्रामस्थांच्या सहकार्याने व शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे वाडगांव ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले आहे. आता राज्यस्तरीय पुरस्कारही वाडगांव ग्रामपंचायतीला मिळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
