चौल गोळबादेवी येथील नुतन रस्ता लोकार्पण सोहळा उत्साहात
चौल गोळबादेवी येथील नुतन रस्ता लोकार्पण सोहळा उत्साहात
रेवदंडा-महेंद्र खैरे-चौल गोळबादेवी येथील नुतन रस्ता लोकार्पण सोहळा कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ, जेष्ठ कार्यकर्ते प्रविण राउत, महेंद्र घरत, जयवंत घरत, अमोल भगत, प्रतिक गुरव, गुरव, काटकर तसेच गोळबादेवी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. यावेळी चौल मध्ये चौल शिवसेनेच्या मागणीने व आमदार महेंद्र दळवी यांचे प्रयत्नाने तसेच जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ यांच्या पाठपुराव्याने एमएमआरडीअे माध्यमातून चौल मधील अनेक रस्ता नुतनीकरणासाठी 19 कोटी 27 लाख रूपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यावेळी गोळबादेवी मंदिर ते नाईक आळी, व ओमप्रकाश पाटील यांचे येथून ओंकार कंटक यांचे घर असे रस्ता नुतनीकरण करण्यात आला आहे. या नुतन रस्ताचे लोकार्पण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
प्रारंभी पुजाअर्चा करण्यात आली, त्यानंतर गोळबादेवी जेष्ठ ग्रामस्थांचे वतीने श्री फळ वाढविण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ यांचे हस्ते फित कापून नुतन रस्ताचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी चौलच्या सर्वागिण विकासासाठी विशेषतः रस्ते व पाणी, लाईट यासाठी सर्वोतोपरी योगदार देण्याचे मनोगत नवनिर्वाचीत जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ यांनी मनोगत व्यक्त केले.


