निवडणुक निकालाचा राग व आनंदाची गळाभेट
निवडणुक निकालाचा राग व आनंदाची गळाभेट
चौल तुलाडदेवी येथे तणावातून हाणामारी, परस्पर विरोधी तक्रार दाखल
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौल जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणूक निकालाचा राग व विजयाचा आनंद यांची गळाभेट झाल्याने चौल तुलाडदेवी येथे तणावातून हाणामारी होवून विजयभंगासह परस्पर विरोधी तक्रारी दाखल रेवदंडा पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेची दखल अलिबाग विभागीय अधिकारी माया मोरे यांनी तातडीने घेतली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चौल-तुलाडदेवी परिसरात दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या वादातून मारहाण, तोडफोड व विनयभंगाच्या आरोपांवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
पहिला गुन्हा राजलक्ष्मी गिरीश खामीतकर (वय ३८, रा. नागाव बिच बंदर, ता. अलिबाग) यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या मामांचा निवडणुकीत विजय झाल्याने ते नातेवाईकांसह फॉर्च्युनर (एमएच ०६ सीएल ६३१८) या वाहनातून शीतलादेवी दर्शनासाठी जात असताना ९ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजता तुलाडदेवी मंदिराजवळील एका पक्ष कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी गाडी आडवून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. तसेच लोखंडी रॉडने गाडीची काच फोडून नुकसान केल्याचे, महिलेला हात धरून ओढल्याचे व अश्लील वक्तव्य केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी १) संस्कार म्हात्रे, २) सुरेंद्र म्हात्रे ३) साहील राउत, ५) मारुती भगत, ५) अजित गुरव ६) अजित मिसाळ, ७) शैलेश परत, ८) आर्यन मिसाळ, ९) प्रतिक नाईक, १०) अजित मगर ११) अजिंक्य मिसाळ १२) रुपाली सुरेंद्र म्हात्रे १३) गणेश म्हात्रे रा. तुलाहदेवी चील १४) विजय भोराले रा. चील, १५) विषाल विजय भोसले रा. रेवदंडा बांदगल्ली, १६) मयंक मारुती भगत रा. चील तुलाडदेवी, १७) सोहम धनेष नाईक रा. चील तुलाइदेवी १७ जणांसह इतर अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा क्रमांक १९/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, दुसरा गुन्हा सुरेंद्र मोरेश्वर म्हात्रे (वय ५८, रा. चौल-तुलाडदेवी) यांच्या फिर्यादीवरून दाखल झाला आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्ष कार्यालयात चर्चा सुरू असताना विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यातून वाद निर्माण झाला. त्यानंतर काही जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून कार्यालयात घुसून लाकडी दांडक्यांनी मारहाण केली व एका महिलेला ओढून तिचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सचीन राज् यांचे कार्यकर्ते १) अंकित गुरव २) अमोल परत ३) सिध्देश शेवईकर ५) निखील राउत, ५) महेंद घरत ६) अमित राउत, ७) विप्देश माळी ८) प्रतिक माळीआठ जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक २०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.







