ताज्याघडामोडी

रेवदंड्यातील सुमित्र पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

रेवदंड्यातील सुमित्र पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
माजी अध्यक्ष कै. कमळाकर (आप्पा) साखळे यांच्या आठवणीने सभागृह भावुक

रेवदंडा, प्रतिनिधी :
रेवदंड्यातील सुमित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी उत्साहात संपन्न झाली. यावर्षी संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष कै. कमळाकर (आप्पा) साखळे यांचे निधन झाल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सभागृहातील वातावरण भावुक झाले.

रेवदंडा मोठे बंदर येथील भंडारी समाज सभागृहात आयोजित सभेचे अध्यक्षस्थान पतसंस्थेचे अध्यक्ष खलिल इनुस तांडेल यांनी भूषविले. यावेळी संचालक महेंद्र नाईक, उमेश कोंडे, राजेंद्र वाडकर, अशोक हवालदार, विजय चौलकर, सदानंद घरत, प्रतिभा वरसोलकर, कमरजब्बीन मुकादम, हेमांगी साखळे, तज्ज्ञ संचालक अनीस हाजते, प्रतिभा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक नागावकर, व्यवस्थापिका क्रांती जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी नूतन अध्यक्ष खलिल तांडेल यांचे संचालक राजन वाडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. कमळाकर (आप्पा) साखळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी चौल व रेवदंडा परिसरातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल संतोष सदाशिव मोरे , पाठारे क्षत्रिय समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष अनंत लक्ष्मण घरत आणि थेरोंडा येथे सापडलेले सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे मालकाकडे सुपूर्द करणाऱ्या सुषमा मंगेश सरपाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. अध्यक्ष खलिल तांडेल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त, आर्थिक ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, वार्षिक अहवाल, नफा वाटप प्रस्ताव, शासकीय लेखापरीक्षण अहवाल, लेखापरीक्षक नियुक्ती तसेच आगामी वर्षाचे अंदाजपत्रक आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *