ताज्याघडामोडी

रेवदंडा एस.टी. बसस्थानक आवारात पाण्याचे तलाव

अखेर पावसाच्या सुरूवातीस
रेवदंडा एस.टी. बसस्थानक आवारात पाण्याचे तलाव
संबधीताच्या दुर्लक्षतेने प्रवासीवर्ग नाराज, अपघातास निमत्रंण

रेवदंडा-महेंद्र खैरे- अखेर पावसाच्या सुरूवातीस रेवदंडा एस.टी.बसस्थानक आवारातील डबक्याचे तलाव निर्माण झाले असून संबधीताच्या दुर्लक्षतेने प्रवासीवर्ग नाराजी व्यक्‍त करीत असून रेवदंडा एस.टी. बसस्थानक आवाराच्या रस्ताच्या दुरावस्थेतेने अपघातास निमत्रंण ठरते आहे.
ृ रेवदंडा बसस्थानक आवारात गेले पावसाळयात खड्डेच खड्डे निर्माण झाले होते, लहान खड्डाचे मोठे खड्डे होवून पाण्याची डबकी, तलाव तयार झाले तेव्हाच झाली होती. त्या पावसाळयात सुध्दा एस.टी. बसस्थानक आगारातील रस्ताची दुरावस्थेबाबत लक्ष्य वेधण्याचा माध्यमानी प्रयत्न केला होता. परंतू संबधीतानी आवारातील रस्ताच्या दुरावस्थेकडे दुर्लक्षीत करून अपघातास निमत्रंण ठेवले आहे. गेले वर्षभर माध्यमाने रस्ताचे दुरावस्थेचे फोटो तसेच अपघाताची अपघाताची आगाउ सुचना दिली आहे. मात्र तरीही संबधीत दुर्लक्ष केले असून गेले वर्षभरात रेवदंडा बसस्थानक आवारातील रस्ताची ना दुरूस्ती ना नुतनीकरण करण्यात आले आहे. प्रवासीवर्ग व बस चालकवर्ग याबाबत संप्तत भावना व्यक्‍त करीत आहेत.
पडलेल्या पहिल्याच पावसात एस.टी. बसस्थानक आवारातील खड्डे पाण्याने भरून डबकी व तळी निर्माण झाली आहे. यापुढील जोरदार पावसात फारच बिकट अवस्था एस.टी. बसस्थानक आवारात दिसून येणार आहे. संबधीताच्या दुर्लक्षतेने प्रवासीवर्गास तसेच एस.टी. बसेस चालकांना सुध्दा ऐन पावसाळयात त्रासदायक ठरणार आहे. स्थानकांच्या आवारात एस.टी. बसेस ये-जा करत असताना या खड्डाने बसेस मधील प्रवाशाना धक्‍का बसतो,तसेच खड्डे चुकविताना वाहन चालकांची सुध्दा भंबेरी उडते, यावेळी स्थानकांच्या आवारातील प्रवाशीवर्ग अथवा स्थानिक यांना बसेस चालकांचे खड्डे चुकविण्याचे प्रयत्नात धक्‍का लागून अपघात होण्याची निश्‍चित शक्यता संभवते. त्यामुळे भविष्यात एस.टी.स्थानकांचा आवारात खड्डे चुकविताना अपघातास निमत्रंण ठरत आहे.
ृ रेवदंडा एस.टी. बसस्थानकांतील आवारातील रस्ताची दुरावस्थे बाबत गेले वर्षभर नुतनीकरण, दुरूस्ती संबधीतानी दुर्लक्षीत केल्याने आगामी पावसाळयात रेवदंडा एस.टी. बसस्थानक आवारात खड्डेच खड्डे व पाण्याची तलाव निश्‍चित होती. रेवदंडा एस.टी. बसस्थानक आवारात संबधीताने केलेल्या दुर्लक्षतेचे प्रवासीवर्ग तसेच एस.टी. बसेस चालक यांनी सुध्दा संप्तत प्रतिक्रिया व्यक्‍त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *