कुभांरआळी ग्रामस्थ व महिलाचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
रेवदंडयातील शेकापक्षाच्या बालेकिल्लात शिवसेनेचा सुरूंग
कुभांरआळी ग्रामस्थ व महिलाचा शिवसेनेत पक्ष प्रवेश;आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले स्वागत
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडयातील कट्टर शेकापक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या, एक पेटी मतदानाने नित्याने प्रत्येक निवडणूकीत रेवदंडयात शेकापक्षाचे निर्विवाद वर्चस्व राखीत असलेल्या कुंभार आळीतील ग्रामस्थ व महिलांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतल्याने शेकापक्षाचा बुरूजास शिवसेनेने सुरूंग लावला असून खरा अर्थाने रेवदंडयातील शिवसेनेची ताकद भक्कम होवून वाढली आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर व विकास कामांचा झंझावातावर विश्वास ठेवीत गेली चाळीस वर्षे रेवदंडा ग्रामपंचायतीत शेकापक्षास हमखास बहुमत देणार्या कुभांर आळी ग्रामस्थ व महिलांचा येथील संत गोरा कुंभार समाज मंदिरात पक्ष प्रवेश कार्यक्रम सोमवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात आला. यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी, रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्लशेठ मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष भट, ग्रा.प.उपसरपंच मंदाताई बळी, तसेच रेवदंडा,थेरोंडा व चौल विभागातील शिवसेना रेवदंडा ग्रा.प.सदस्य, सदस्या, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे प्रमुख उपस्थितीत रेवदंडा ग्रामपंचायत विदयमान शेकापक्षाच्या सदस्या लिना मानकर यांच्यासह कुंभार आळी गाव प्रमुख प्रशांत मानकर, किशोर मानकर, राजेश मानकर, अनिल मुकादम, जगदीश मानकर, या प्रमुख कार्यकर्त्यासह कुभांरआळी ग्रामस्थ व महिला यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.
यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी शिवसेनेची भगवी शाल प्रदान करून पक्ष प्रवेश करणार्या शेकापक्षाच्या रेवदंडा ग्रा.प.सदस्या लिना मानकर, किशोर मानकर तसेच कुंभारआळी ग्रामस्थ व महिला यांचे शिवसेना पक्षामध्ये स्वागत केले. तत्पुर्वी कुंभारआळी ग्रामस्थांचे वतीने ग्रा.प.सदस्या लिना मानकर, किशोर मानकर, ग्रामस्थ व महिला यांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून केले.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमांस ग्रा.प.सदस्य दुशांत झावरे, ग्रा.प.सदस्या आशाकमल नाखवा, ग्रा.प.सदस्या दिक्षा बळी, शिवसेना महिला रेवदंडा शहर अध्यक्षा शलाका राउत, शिवसेना कार्यकर्ते केदार खोत, रेवदंडा शहर अध्यक्ष योगेश पिटनाईक, समीर आठवले, विजय हाडकर,मन्सुर तांडेल,शैलेश गोंधळी,विवेक दांडेकर,हर्षल घरत,प्रसाद गोंधळी, भारती मोरे,तनुजा घरत, गौरी मोरे,केतन झावरे,ताराचंद कोंडे, तसेच रेवदंडा,थेरोंडा व चौल विभागातील शिवसेना रेवदंडा ग्रा.प.सदस्य, सदस्या, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. .
दरम्यान रेवदंडा कुभांर आळी ग्रामस्थ व महिलांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने शेकापक्षाचे निर्विवाद वर्चस्वाला मोठा धक्का बसला असून आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेची ताकद खर्या अर्थाने वाढीस जात असल्याचे म्हटले जाते.