घडयाल तेच,फक्त वेळ बदलली, सुनिल तटकरे यांचा झंझावात सुरू
घडयाल तेच,फक्त वेळ बदलली, सुनिल तटकरे यांचा झंझावात सुरू
वाघोली,श्रीगाव,शहाबाज,घोटवडे,चरी,पोयनाड ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश
रेवदंडा-महेंद्र खैरे-घडयाल तेच फक्त वेळ बदलली हा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महायुतीचे रायगडचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या रायगड लोकसभा निवडणूकीचा झंझावात सुरू झाला असून अलिबाग तालुक्यात त्यांना मोठा प्रतिसाद लाभतो आहे, अलिबाग येथे नुकताच वाघोली,श्रीगाव,शहाबाज,घोटवडे,पोयनाड ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश घेतला, यावेळी सुनिल तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले.
अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका जिल्हा कार्यालय पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनिल तटकरे होते, तसेच अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अमित नाईक, चारूशेठ मगर,जिल्हा सचिव आशिष भट, जिल्हा संघटक ॠषीकांत भगत, जिल्हा महिला संघटक मानसीताई चौलकर, अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, युवक अध्यक्ष मनोज शिर्के, दिपक रानवडे, वाडगाव ग्रा.प. माजी सरपंच सरिता भगत, आदी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी वाघोली,श्रीगाव,शहाबाज,घोटवडे,पोयनाड ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांनी प्रास्ताविकेने केली. उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांचे हस्ते सुनिल तटकरे यांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून केले. विविध पक्षातील वाघोली,श्रीगाव,शहाबाज,घोटवडे,पोयनाड ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश घेतला त्यांचे स्वागत सुनिल तटकरे यांनी केले. यामध्ये वाघोली ग्रामस्थ मनोहर वालेकर, मोहन वालेकर, अशोक वालेकर, विजय वालेकर, किरण वालेकर,प्रशांत वालेकर, प्रफुल्ल वालेकर,मधुकर वालेकर,निलेश वालेकर,पारस वालेकर,विनायक पागार,तसेच श्रीगाव ग्रामस्थ ईश्वर नाईक, शहाबाज ग्रामस्थ प्रशांत पाटील, समीर तरे,घोटवडे ग्रामस्थ प्रणीत ठाकू, पवन थळे, अनूज लोहार, प्रसाद शिंदे, दिलिप शिंदे,चरी ग्रामस्थ विशाल पाटील,पोयनाड ग्रामस्थ संतोष पाटील, दत्ताराम म्हात्रे,मधुकर राउत,सुनिता पाटील,आशा पाटील, प्रशांत पाटील,संतोष राउत,संतोष पाटील,सुलोचना भोपी,प्रित पाटील,आर्या पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश घेतला.
यावेळी उपस्थितांना मनोगत व्यक्त करताना सुनिल तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदार संघात केलेल्या विविध विकास कामाचा तपशील सांगीतले, तर आगामी निवडणूकीत सर्व स्तरातून पांठिबा मिळत असल्याचे सांगितले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी झोकून काम करावे असे आवाहन केले.