रेवदंडा आंग्रेनगरची अंडरआर्म क्रिकेट प्रिमियर लीग उत्साहात

रेवदंडा आंग्रेनगरची अंडरआर्म क्रिकेट प्रिमियर लीग उत्साहात
रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडा आंग्रेनगर आयोजीत अंडरआर्म प्रिमियर लीग मोठया उत्साहात संपन्न झाली. यावेळी आंग्रेनगर युवावर्ग, व ग्रामस्थ यांचा सहभाग होता तर महिलावर्गानी उपस्थित राहून आनंद लुटला.
रेवदंडा हरेश्वर मैदानात दि. 17 मार्च रोजी सकाळी दहा ते सायकांळी सहा दरम्यान आंग्रेनगर युवावर्गानी एक दिवस गावासाठी साजरा केला. यावेळी गावातील युवा व जेष्ठ ग्रामस्थांनी सहभागी घेतला. या स्पर्धेत अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आठ संघ मालकांचे संघ दाखल झाले. या स्पर्धेचा शुभारंभ रेवदंडा ग्रा.प. सरपंच प्रफुल्ल मोरे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ झाला. या स्पर्धेचे नियोजन शिवसेनेचे रेवदंडा ग्रा.प. सदस्य दुशांत झावरे यांच्या मार्गदर्शना खाली झाले. ही स्पर्धा मोठया खेळीमेळीत व उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ 11 आंग्रेनगर, व्दितीय क्रमांक आराध्य 11 आंग्रेनगर, तृतीय क्रमांक अण्णा पुरस्कृत त्रिशा 11 आंग्रेनगर, चतुर्थ क्रमांक शिवांश 11 आंग्रेनगर, उत्कृष्ट गोलदांज समर्थ 11 आंग्रेनगरचा दिलिप धुमाळ, शिवांश 11 आंग्रेनगर रोशन भोईर उत्कृष्ट फलदांज, समर्थ 11 आंग्रेनगरचा रोहित भोईर मालिकावीर, शिस्तबंध्द खेळाडू शिवांश 11 आंग्रेनगरचा नमित म्हात्रे,सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू लहान गट समर्थ 11 आंग्रेनगरचा तनिष गोवर्धने,सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू आराध्य 11 आंगे्रनगर ओम भाटकर, उत्कृष्ट झेल शेळके वारियर्स सुशांत झावरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आराध्य 11 आंग्रेनगर बबन लाड यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण संदिप खोत,सुहास घोणे, निलेश खोत, ग्रा.प.सदस्या मढवी, अरूण विचारे,सुभाष शेळके,योगेश चेरकर आदीच्या हस्ते संपन्न झाला.