ताज्याघडामोडी

केंद्रात इंडिया आघाडीची सत्‍ता निश्‍चित-माजी खासदार अनंत गिते

चौल ग्रामपंचायतीच्या आएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात रंगला इंडिया आघाडीचा प्रचार
केंद्रात इंडिया आघाडीची सत्‍ता निश्‍चित-माजी खासदार अनंत गिते
माजी व भावी खासदार अनंत गिते-आम.जयंतभाई पाटील

रेवदंडा-महेंद्र खैरे- आगामी लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असल्याने चौल ग्रामपंचायतीच्या आयसो मानाकंन प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात इंडिेया आघाडी व शेकापक्षाचे नेते विधानपरिषद आमदार जयंतभाई पाटील व माजी केंद्रीय अवजड उदयोग मंत्री अनंत गिते यांच्या प्रमुख उपस्थितीने इंडिया आघाडीचा प्रचार कार्यक्रमच ठरला, यावेळी केंद्रात इंडिया आघाडीची सत्‍ता निश्‍चित असल्याचे माजी के्रद्रीय अजवड उदयोग मंत्री अनंत गिते यांनी मार्गदर्शन करताना म्हटले. तर सुरूवातीस उपस्थितांना मार्गदर्शन करतानाच माजी व भावी खासदार अनंत गिते असे आमदार जयंतभाई पाटील यांनी उल्‍लेख केला. यावेळी आएसओ मानांकन प्रमाणपत्र बाबत महत्व दोन्ही नेत्यानी विस्तारपणे मांडले.
चौल ग्रामपंचायतीच्या वतीने श्री रामेश्‍वर मंदिराचे प्रांगणात आएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम गुरूवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात आला. प्रसंगी उबाठा शिवसेनेचे माजी अवजड उदयोग मंत्री अनंत गिते, शेकापक्षाचे विधानपरिषद आमदार जयंतभाई पाटील, उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी राजिप उपाध्यक्ष अ‍ॅड आस्वाद पाटील,चौल सरपंच प्रतिभा पवार, माजी पं.स. उपसभापती संदिप घरत, युवासेना जिल्हा अधिकारी अमिर उर्फ पिंटया ठाकूर, उबाठा शिवसेना महिला जिल्हा संघटिका जितेंश्री पोटफोडे, उबाठा शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख शंकर गुरव, अतिरिक्‍त गटविकास अधिकारी मंगेश पाटील, कोर्लई सरपंच राजश्री मिसाळ, सतिश पाटील, आएसओ मानाकंनचे किरण भगत आदी मान्यवराची उपस्थिती व्यासपिठावर होती.
कार्यक्रमाचे सुरूवातीस माजी खासदार अनंत गिते, आमदार जयंतभाई पाटील व उपस्थित मान्यवर मंडळी यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर यांचे स्वागत चौल ग्रा.प. सरपंच प्रतिभा पवार, उपसरपंच अजित गुरव यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आला. यावेळी चौल ग्रा.प. वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले.
सुरूवातीस आएसओ मानांकनचे किरण भगत यांनी आएसओ संदर्भात माहिती सांगतानाच त्यांनी वैयक्‍तीक माहिती सुध्दा सांगितली, तर उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी चौल ग्रामपंचायतीस आएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले हे संपुर्ण चौलकरांसाठी आनंदाचे व अभिमानस्पद असल्याचे म्हटले. तर आमदार जयंतभाई पाटील यांनी प्रांरभीच अनंत गिते माजी व भावी खासदार असे सांगून आगामी लोकसभा निवडणूकीत रायगडचे खासदार अनंत गिते असतील असे सुचीत केेले. यावेळी त्यांनी माजी खासदार अनंत गिते यांचेवर स्तुतीसुमने उधळताना माजी खासदार अनंत गिते चरित्रवान नेते, चरित्रावर कोणतेही डाग नसलेले नेते असे आवर्जुन सांगितले. यावेळी चौलमध्ये पाण्याची समस्या लवकरच सुटेल अशी ग्वाही देतानाच जागतिक बँकेकडून दिडशे कोटी रूपयांचा निधीतून अलिबाग शहर परिसरातील ग्रामपंचायत मध्ये भुमिगत विदयुत वाहिनीचे काम सुरू असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सर्वानी एकत्रीत येउन काम करावे लागेल,विरोधकांनी एकत्रीत राहिल्यास विजय निश्‍चित असल्याचे म्हटले.शेवटी सध्याचे सरकार मोदी सरकार नसून ते भारत सरकार आहे असे सांगितले.
यावेळी माजी अवजड उदयोग मंत्री यांनी प्रमुख अतिथी म्हणून संबोधीत करताना प्रारंभीच रायगडसाठी खासदार निवडणुकीत माजी खासदार अनंत गिते यांचे नाव आम. जयंतभाई पाटील यांनी श्रीवर्धन येथील कार्यक्रमांस जाहीर केल्याचे सांगून रा.कॉ.चे शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना लोकसभा उमेदवारीसाठी नाव सुचीत केल्याचे प्रारंभीच सांगितले.यावेळी त्यांनी आएसओ मानाकंन ही दर्जा निश्‍चित करणारी जागतिक संस्था असल्याचे सांगून आएसओ मानांकन म्हणजे विशिष्ट चाकोरीत बांधून घेणे, यावेळी दप्तराचे नियोजन प्रत्येक संस्थेला अत्यावश्यक असल्याचे म्हटले. लोकशाहीचा सार्थ अभिमान असून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश ही ओळख आहे. यावेळी शिवकालीन दप्तर आपल्याला पहावयास मिळते त्यांचे सारे श्रेय बाळाजीराव चिटणीस यांना जाते, छत्रपती शिवाजी महाराजाचे दत्परांवर विशेष लक्ष्य असे, शिवाजी महाराज शुरवीर तसेच उत्‍तम प्रशासक सुध्दा होते, त्यांनी स्वराज्यात अष्टप्रधान मंडळ नेमले, शिवाजी महाराजासारखा प्रशासक जगाचा पाठीवर होणे नाही असे सांगितले. लोकशाहीची मोहोर सुध्दा शिवशाही रूतलेली आहे असे स्पष्ट सांगितले.यावेळी देशाच्या व राष्ट्राच्या हितासाठी विरोधकांनी ऐक होण्याची आवश्यकता आहे. काल काय घडले ते विसरू या, उदया काय घडवायचे आहे ते त्याचा विचार करू, नेत्यामध्ये झाले, कार्यकर्त्याचे सुध्दा 100 टक्के मनोमिलन होईल. इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशात नव्हे,महाराष्ट्रात नव्हे तर रायगड मध्ये सुध्दा इतिहास निर्माण करू अशी खात्री असल्याचे सांगून त्यांची चिंता नसल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी अलिबाग मध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळणार असा विश्‍वास व्यक्‍त केला, मात्र भास्कर जाधव यांनी सर्वाधिक मताधिक्य रत्नागिरी-गुहागर मधून देणार आहेत असे सांगितले. नेते,आमदार गेले तरी शिवसेनेचे मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतात,तसेच शेकापक्षाचे मतदार सुध्दा शेकापक्षाचे पाठीशी राहतात असे ठामपणे सांगून त्यामुळे अलिबाग मध्ये मताधिक्य निश्‍चितपणे मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविस्तार अधिकारी ॠतिका पाटील यांनी तर सुत्रसंचलन विकास पिंपळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन चौल ग्रा.प. सरपंच,सदस्या,सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारीवर्ग यांनी केले होते. यावेळी मोठया संख्येने चौल ग्रामस्थ व महिला यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *