ताज्याघडामोडी

मांडळा ते काकळघर रस्त्याची सलग पाच वर्षे दुरवस्थापंचक्रोशीतील संप्तत ग्रामस्थांचा बोर्ली नाक्यावर रास्ता रोको जनआंदोलन

मांडळा ते काकळघर रस्त्याची सलग पाच वर्षे दुरवस्था
पंचक्रोशीतील संप्तत ग्रामस्थांचा बोर्ली नाक्यावर रास्ता रोको जनआंदोलन

रेवदंडा-महेंद्र खैरे- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला रस्ता मंजूर होवून सुध्दा सुप्रभात कंस्ट्रशन कंपनीने ठेका घेउन काम पुर्ण न केल्याने मांडळा ते काकळघर रस्ता सलग पाच वर्षे दुरावस्थेत आहे. अखेर पंचक्रोशतील संप्तत ग्रामस्थांनी बोर्ली नाक्यावर रास्तारोको जनआंदोलन पुकारले.
मुरूड तालुक्यातील मांडळा ते काकळघर रस्ता सलग पाच वर्षे दुरावस्थेत आहे, काकळघर पंचायत हद्दीतील महाळुंगे बु्र. पारगाण, पारगाण ठाकूर वाडी, महाळुंगे बु्र. आदिवासीवाडी,महाळुंगे ब्रु.ठाकुरवाडी, काकळघर,काकळघर आदिवासीवाडी, चिंचघर, डाकेली, वांदेली ग्रामस्थांना या रस्ताने जा-ये करताना रस्त्याच्या दुरावस्थेने खुप त्रासदायक होते, तर गर्भवती महिला, वयोवृध्द, शालेय विदयार्थी, यांना अतोनात त्रास सहन करावा लागत असे,रस्ताच्या दुरावस्थेने येथे येणारी काकळघर एस.टी. बस सेवा बंद करण्यात आली आहे. शिवाय रस्ताच्या दुरावस्थेने अनेक अपघात होवून अनेकजण जखमी झाले होते. स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते अलिबाग-रायगड यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रस्ताचे काम 15 दिवसांत सुरू झाले नाही तर बुधवार दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी बोर्ली नाका येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मात्र निवेदनाचा इशारा देवून सुध्दा काम सुरू न केल्याने पंचक्रोशीतील संप्तत ग्रामस्थांनी शेकडोंच्या संख्येने एकत्रीत येवून बोर्ली नाका येथे अकरा वाजता रास्ता रोको जनआंदोलन पुकारले. या जनआंदोलनात पंचक्रोशी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खाते व सुप्रभात कंस्ट्रशन ठेकेदाराचा जोरदार निषेध केला. दोन्ही बाजूने वाहने जा-ये पुर्णतः बंद करणेत येवून रास्ता रोको जन आंदोलन सुरू केले. यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज सपोनि श्रीकांत किरवले यांनी पोलिस कर्मचारीवर्ग तैनात करून कडक बदोबस्त ठेवला होता, तर अलिबागहून उपअधिक्षक शिवाजी फडतरे हे देखील जातीने हजर राहिले होते.अखेर उपअधिक्षक शिवाजी फडतरे व पंचक्रोशाी ग्रामस्थ नेते यांचे मध्ये उपविभागीय कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरेश खेडेकर यांचेशी मध्यस्ती करून चर्चा घडविली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी उपविभागीय कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरेश खेडेकर यांना चांगलेच धारेवर धरले. शेवटी ग्रामस्थांची आक्रमकता पाहून त्यांनी दि.8 फेब्रुवारी 2024 पासून मांडळा ते काकळघर काम पुर्ण करून देण्याची हमी दिली. या आश्‍वासनाचे लेखीपत्र रेवदंडा पोलिस ठाणे येथे ग्रामस्थ नेतेमंडळीना त्यांनी दिले. दरम्यान अलिबाग व मुरूड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी या रस्ताच्या दुरूस्तीसाठी 18 लाख 50 रूपयांचा निधी मंजूर केला.
या जनआंदोलनात काकळघर पंचायत हद्दीतील महाळुंगे बु्र. पारगाण, पारगाण ठाकूर वाडी, महाळुंगे बु्र. आदिवासीवाडी,महाळुंगे ब्रु.ठाकुरवाडी, काकळघर,काकळघर आदिवासीवाडी, चिंचघर, डाकेली, वांदेली ग्रामस्थांसह भरतशेठ बेलोसे,भगिरथ पाटील,सुरेश ठाकूर,सि.एम.ठाकूर,निलेश घाटवळ,सुरेश पालवणकर,विकी वेगस,सतेज ठाकूर, प्रफुल्‍ल पालवणकर, काकळघर ग्रा.प.सरपंच स्वस्तिक ठाकूर,अजगर दळवी,काळीताई ठाकूर,माजी सरपंच सुचिता पालवणकर,समिर दांडेकर,शैलेश रातवडकर,भारत मोती,बोर्ली ग्रा.प.सरपंच सपना जायपाटील,खलिल नाईक,महेश पाटील,सागर चौलकर, आदी मान्यवर मंडळीने सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *