वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा शानदार शुभारंभ सोहळा संपन्न
अलिबाग मध्ये इनडोअर क्रिडांगणासाठी निश्चित प्रयत्न-खासदार सुनिल तटकरे
वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा शानदार शुभारंभ सोहळा संपन्न
रेवदंडा-महेंद्र खैरे- वाडगावच्या कुस्ती प्रशिक्षण संकुलात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल तयार होतील असा आशावाद व्यक्त करून आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी मनोगतातील अलिबाग मध्ये इनडोअर क्रिडांगण व्हावे या सदिच्छेला पांठीबा देत भविष्यात क्रिडामंत्री बनसोडे यांचेकडे पाठपुरावा करून अलिबाग मध्ये इनडोअर क्रिडांगणासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असे आश्वासीत करताना, जिल्हा क्रिडा संकुलाची दुरवस्थेबाबत खंत खासदार सुनिल तटकरे यांनी वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण संकुलाच्या शानदार शुभारंभ सोहळा प्रसंगी संबोधीताना केले.
अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे खासदार सुनिल तटकरे यांच्या 50 लाख रूपये मंजूर निधीतून कुस्ती प्रशिक्षण संकुल बांधण्यात येत आहे, यांचे भुमिपुजन कार्यक्रम सोहळा अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष जयेंद्र भगत,वाडगाव ग्रामपंचायत,वाडगाव ग्रामस्थ व जय हनुमान तालिम वाडगाव यांचे विदयमाने आयोजीत करण्यात आला होता. या प्रसंगी खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्रशेठ दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, भाजप जिल्हा सचिव अँड महेश मोहिते, रा.कॉ. जिल्हा सचिव आशिष भट, रा.कॉ. अलिबाग व मुरूड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, शिवसेना सल्लागार दिपक रानवडे, वाडगाव ग्रा.प.सरपंच सारिका पवार, माजी सरपंच सरिता भगत, चंद्रकांत थळे,तसेच ग्रा.प. सदस्य व सदस्या आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.
यावेळी वाडगाव ग्रामपंचायत,ग्रामस्थ व जय हनुमान तालिम संघ यांचे वतीने उपस्थित मान्यवराचे जोरदार स्वागत व विदयार्थ्यानी लेझीमच्या तालावर केले. कार्यक्रमाचे सुरूवातीस कुस्ती प्रशिक्षण संकुल बांधकामाचे भुमिपुजन खासदार सुनिल तटकरे व आम. महेंद्र दळवी यांचे हस्ते पुजाअर्चा,श्रीफळ वाढवून तसेच कुदळ मारून करण्यात आले. त्यानंतर प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे सर्वोसुवा अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांनी प्रास्ताविकेत संकुलाच्या पुर्ततेनंतर अलिबागसह जिल्हातील कुस्तीपटूना प्रशिक्षणाची उणीव भासू देणार नाहीे असे निश्चित आश्वासन दिले. तर भाजप अॅड महेश मोहिते यांनी वाडगाव येथे होत असलेल्या कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा आनंद व अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. तर आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी अलिबाग मध्ये इनडोअर क्रिडांगण व्हावे अशी संकल्पना खासदार सुनिल तटकरे यांचेकडे व्यक्त केली. त्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांनी संबोधीताना वाडगावच्या कुस्ती प्रशिक्षण संकुलात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल तयार होतील असा आशावाद व्यक्त करून आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी मनोगतातील अलिबाग मध्ये इनडोअर क्रिडांगण व्हावे या सदिच्छेला पांठीबा देत भविष्यात क्रिडामंत्री बनसोडे यांचेकडे पाठपुरावा करून अलिबाग मध्ये इनडोअर क्रिडांगणासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असे आश्वासीत करताना, जिल्हा क्रिडा संकुलाची दुरवस्थेबाबत खंत खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे निमित्ताने वाडगाव नुतन बसस्टॉप, दत्त मंदिर नुतन पायर्यांचे व सुशोभिकरण, आदी कामाचा शुभारंभ खासदार सुनिल तटकरे व आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले.