ताज्याघडामोडी

चौल येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जनसंवाद दौरा; जय्यत तयारी

चौल येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जनसंवाद दौरा; जय्यत तयारी
रेवदंडा-महेंद्र खैरे- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा अंतर्गत दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी दोन वाजता चौल पिरांचे देउळ येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चौल येथील जनसंवाद दौराची जय्यत तयारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून शिवसेना अलिबाग व मुरूड तालुका पदाधिकारी व चौल शिवसेना कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदार संघासाठी चौल हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शिवसेना मुरूड,अलिबाग व रोहा विधानसभा मतदार पदाधिकारी, शिवसैनिक यांना सोयीचेे असल्याने जनसंवाद दौरा अंतर्गत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा घेतली जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसते. चौल पिरांचे देउळ येथे मुख्यः रस्तालगतच्या मैदानात या जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गेले आठ दिवस शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे तसेच अलिबाग व मुरूड तालुका शिवसेना पदाधिकारी व चौल शिवसैनिक विशेष परिश्रम घेत आहेत. या जनसंवाद सभेसाठी मोठया संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती लक्ष्यात घेवून भव्य पटागंणात मंडप घालण्यात आले आहे, भव्य विचारमंचसह बसण्यासाठी आसन व्यवस्था खुर्च्याची सोय करण्यात आली आहे. तसेच आजुबाजूच्या परिसरात वाहनांच्या पार्किगची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे.
चौल पिरांचे देउळ येथे होत असलेल्या सभे निमित्‍त चौल बागमळा ते तुलाडदेवी परिसरात मुख्य रस्त्यावर भगवे झेंडे लावण्यात आले असून भगवे वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. या जनसंपर्क सभेच्या निमित्‍ताने शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे प्रथमच चोैल येथे येत असल्याने शिवसैनिका मध्ये उत्साह दिसून येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *