वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा भुमीपुजन सोहळा

वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा भुमीपुजन सोहळा
खासदार सुनिल तटकरे यांच्या निधीतून व जयेंद्र भगत यांच्या प्रयत्नाने
रेवदंडा-महेंद्र खैरे-अलिबाग नजीक वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण संकुल खासदार सुनिल तटकरे यांच्या निधीतून व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष व अलिबाग कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांचे प्रयत्नाने उभारण्यात येत आहे. या कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा भव्य भुमीपुजन सोहळा शुक्रवार दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी सायकांळी पाच वाजता ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव,ग्रामस्थ वाडगाव,व हनुमान तालीम संघ वाडगाव यांचे विदयमाने आयोजीत करण्यात आला आहे.
या भव्य कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा भुमिपुजन सोहळा कार्यक्रमास खासदार सुनिल तटकरे यांचे प्रमुख उपस्थिती लाभणार असून खासदार सुनिल तटकरे यांचे शुभहस्ते कुस्ती प्रशिक्षण संकुलाचे भुमिपुजन करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, अलिबाग-मुरूड विधानसभा आमदार महेंद्र दळवी,विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे,रायगड जिल्हा क्रिडा अधिकारी राजेंद्र हातनुर, कुस्तीगीर संघटना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,कुस्तीगीर संघटना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे,कुस्तीगीर संघटना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद खजिनदार सुरेश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी,भाजप जिल्हा चिटणीस रायगड अँड महेश मोहिते, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलिप (छोटमशेठ)भोईर, राजिप कार्यकारी अभियंता प्रसन्नजीत राउत, कार्यकारी अभियंता संजय वेगुर्ळेकर, रा.कॉ. जिल्हा चिटणीस चारूहास मगर, रा.कॉ. अलिबाग-मुरूड मतदार संघ अध्यक्ष अमित नाईक, राजिप उपअभियंता राहूल शेवाळे, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष बळीराम बळीराम पाटील, सरपंच गोवे-रोहा महेंद्र पोटफोडे, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटना कार्याध्यक्ष सुभाष घासे, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटना सचिव मारूती आडकर, कुस्तीगीर संघटना अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, अलिबाग तालुका क्रिडा अधिकारी सचिन निकम, खालापुर तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष डाँ. सुनिल पाटील,रोहा तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष नंदुशेठ म्हात्रे, रायगड जिल्हा क्रिडा मार्गदर्शक संदिप वांजले, कर्जत तालुका कुस्तीगीर संघटन अध्यक्ष भगवान धुळे, पेण तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, उरण तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष गोपाळ म्हात्रे, सुधागड तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष संतोष फाटक, महाडतालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष वैभव सकपाल, अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटना उपाध्यक्ष कृष्णा भोपी, वाडगाव ग्रा.प. ग्रामविकास अधिकारी बाबुराव वनवे, वाडगाव ग्रा.प. सरपंच सारिका पवार,वाडगाव ग्रा.प.माजी सरपंच सरिता भगत, वाडगाव हनुमान तालीम संघ अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, उपाध्यक्ष गोपिनाथ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या नियोजीत कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा अलिबाग तालुक्यासह संपुर्ण रायगड जिल्हांतील कुस्तीपट्टूना प्रशिक्षणासाठी लाभ घेता येणार आहे, अदयापी संपुर्ण कोकणपट्टीत कुस्ती प्रशिक्षण संकुल उपलब्ध नसल्याने कुस्ती प्रशिक्षणासाठी येथील कुस्ती खेळाडूना प्रशिक्षणासाठी पुणे, सांगली, कोल्हापुर आदी ठिकाणी जावे लागत असे. कुस्तीच्या कौटूबिंक वारसा घेऊन शालेय जीवनापासून कुस्ती मध्ये अग्रक्रमाने सहभागी झालेले अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष व गेले पाच वर्षे अलिबाग कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद भुषविणारे जयेंद्र भगत यांना अलिबाग तालुक्यासह संपुर्ण रायगड मध्ये कुस्ती प्रशिक्षणाची उपलब्धता होत नसल्याची खंत मनात होती.
अलिबाग तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपदी असताना जयेंद्र भगत यांनी कुस्ती साठी सातत्याने मोठे योगदान दिले आहे. अलिबाग मध्ये कुस्ती प्रशिक्षण संकुल व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले, व रायगड जिल्हांत कुस्ती प्रशिक्षण संकुल व्हावे यासाठी त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांचेकडे मागणी केली होती. रोहा-सुतार वाडी येथे खासदार सुनिल तटकरे यांचे निवासस्थानी भेटीस जयेंद्र भगत व विजयी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य गेले असता, खासदार सुनिल तटकरे यांनी वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण संकुलासाठी ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव व्यायामशाळा बांधणे या विषयाने खासदार 50 लाख रूपये निधी मंजूर करावे असे पत्र जिल्हाधिकारी रायगड यांना दिले होते.