ताज्याघडामोडी

चोरढे शाळेत साकारले मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर

चोरढे शाळेत साकारले मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर
रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे मराठी, रामकृष्ण मठ मिशन व ग्रुप ग्रामपंचायत चोरढे यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी शाळा चोरढे मराठी येथे आयोजित केलेले होते.शिबिराचे उदघाटन सरपंच सौं. तृप्ती घाग व vstf प्रमुख श्री. गजभिये सर यांच्या हस्ते करण्यात आले.चोरढे शाळेत नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. शाळा चोरडे येथे लेझीम पथक,मलखाब पथक, नृत्य पथकाचे सादरीकरण केले जाते. शाळा गुणवत्ता निर्धारणात अ श्रेणीत असते. दरवर्षी पालकांचा एक दिवसाचा मोडा घेऊन शाळेच्या भौतिक सुविधा सुधारण्यासाठी पालकांचे सहकार्य घेतले जाते. मोतीबिंदू शिबिरामध्ये २४८ रुग्णाची तपासणी करण्यात आली.४७ रुग्ण मोतीबिंदू ऑपरेशन साठी रेफर करण्यात आले. या रुग्णांना मुंबईला दवाखान्यात मोफत नेण्यात येऊन त्यांच्यावर मोफत ऑपरेशन करण्यात येईल. ऑपरेशन झाल्यानंतर दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेकीखाली ठेवून त्यांना घरी सोडण्यात येते. ही संपूर्ण प्रक्रिया रामकृष्ण मठ मिशनद्वारे मोफत करण्यात येते. १०० रुग्णाना चष्मे देण्यात आले. सरपंच सौं. तृप्ती ऋतिक घाग यांजकडून पाहुण्यांना नाष्टा व जेवणाची सोय करण्यात आली. शिबिरासाठी उपसरपंच श्री. चंद्रकांत वाघे, अनिल चोरढेकर, सौं. दीपिका आमलिकर, vstf जिल्हा प्रमुख श्री गजभिये सर,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री. सुरेश ताबडे,ऋत्विक घाग, सुनील घाग,रंजना चोरढेकर, सौं. माधुरी शेडगे, सौं. लीना ताबडे, श्री. विनायक थळकर गुरुजी व इतर सर्व ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिबिराच्या नियोजनासाठी मुरुड गटशिक्षण अधिकारी श्री सुनील गवळी व शिक्षणाधिकारी सौ पुनिता गुरव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.शिबीर यशस्वी करण्यासाठी मुखाध्यापक सौं. संगीता भगत, विजय जाधव, रमेश सुभेदार, प्रतिभा वर्तक, राजेंद्र नाईक, इर्शाद बैरागदार यांनी नियोजन केले. शिक्षकांनी केलेल्या या ग्रामस्थांच्या उपक्रमासाठी सर्व गावकऱ्यांकडून शिक्षकांचे, ग्रामपंचायत व रामकृष्ण मठ मिशनचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *