ताज्याघडामोडी

रेवदंडा येथील क्रिकेट स्पर्धेत निखिल 11 चिकणी संघ प्रथम विजेता

रेवदंडा येथील क्रिकेट स्पर्धेत निखिल 11 चिकणी संघ प्रथम विजेता
चौल चुनेकोळीवाडा व घरत आळी चषक

रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडा येथील हरेश्‍वर मैदानात दि. 56,27,28 जानेवारी रोजी चौल चुनेकोळीवाडा व घरत आळी चषक मर्यादीत षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत निखिल 11 चिकणी संघ प्रथम विजेता ठरला तर उपविजेता विजय मार्तंड थेरोंडा, तृतीय क्रमांक रूहान 11 साखर, चतुर्थ क्रमांक जय बजरंग तळेखार ब संघ विजेते ठरले. या स्पर्धेत मालिकावीर साखर संघाचा रोनित नाखवा,उत्कृष्ट फलदांज विजय मार्तंड थेरोंडा संघाचा यश जंगली, उत्कृष्ट गोलदांज विजय मार्तंड थेरोंडा संघाचा आकाश सुडकू,उत्कृष्ट यष्टीरक्षक जयेंद्र बलकवडे,शिस्तबंध्द फिल्डर विजय घाणेकर यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना उध्दव ठाकरे गट जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौल ग्रा.प.उपसरपंच अजीत गुरव, रेवदंडा ग्रा.प. उपसरपंच मंदाताई बळी, निलेश खोत,हर्षल घरत आदी मान्यवराचे हस्ते संपन्न झाला. या स्पर्धेत एकूण 32 आमंत्रीत संघ खेळविण्यात आले. तर स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये 25 हजार व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 12 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 5 हजार व भव्य चषक, चतुर्थ क्रमांकास रूपये 5 हजार व भव्य चषक, तसेच उत्कृष्ट फलदांज,गोलदांज,यष्टीरक्षक,व शिस्तबंध्द फिल्डर व प्रत्येक सामन्यातील सामनावीरास चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.
स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम रेवदंडा ग्रा.प. सरपंच प्रफुल्‍ल मोरे, चौल ग्रा.प. उपसरपंच अजीत गुरव, प्रशांत जाधव, नाईक, बाजी, बागडेकर आदी मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत पार पडला.स्पर्धेचे सुत्रसंचलन तेजस शिंदे, रोशन भोईर व गुणलेखन बंटी शेळके यांनी केले. तर स्पर्धेचे मुख्य आयोजक कुणाल भट्टीकर व संदेश बाजी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *