रेवदंडयाच्या मुख्यः रस्त्यालगत डंपिग ग्राउंड; ग्रामस्थांची मुजोरी
रेवदंडयाच्या मुख्यः रस्त्यालगत डंपिग ग्राउंड; ग्रामस्थांची मुजोरी
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडयात प्रवेश करताच,थेरोंडा पानसेवाडी नजीक टॉकिज रस्ता नजीक मुख्यः रस्तावर ग्रामस्थांनी मुजोरी करून केरकचरा,प्लॅष्टिक, आदी घाणीचे साहित्य टाकून डंपिग ग्राउंड निर्माण केले आहे. परिसरातून जा-ये करणार्याना दुर्गधी सहन करूनच पुढे जावे लागते, अनेकांनी या अघोषीत डंपिग ग्राउंड बाबत संपप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
रेवदंडा मुख्यः रस्त्यालगत ग्रामस्थांनी केरकचरा,प्लॅष्टिक व घाणीचे साहित्य टाकून आकस वृत्तीने डंपिग ग्राउंड तयार केले आहे. निदान मुख्यः रस्तालगत केरकचरा,वर्गेरे घाणीचे साहित्य न टाकण्याची खबरदारी सुध्दा स्थानिक ग्रामस्थ घेत नसल्याचे दिसते. स्थानिक ग्रामस्थांच्या बेशिस्तीने मुख्यःरस्तालगत डंपिग ग्राउंड तयार झाल्याने समस्तः रेवदंडकरांना शरमेची बाब झाली आहे. मात्र बिनधास्त व कोणताही धाक न घेता, परिसरातील स्थानिक ग्रामस्थ केरकचरा तेथेच टाकत आहेत.
याबाबत काही ग्रामस्थांनी रेवदंडा ग्रामपंचायतीचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न जरूर केला आहे,काही ग्रामस्थांनी रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे यांचेशी थेट संपर्क करून या डंपिग ग्राउंड बाबतची तक्रार व माहिती दिली आहे. रेवदंडयाच्या प्रवेशव्दाराजवळील मुख्यःरस्त्यालगत आकसाने बनविण्यात आलेले डंपिग ग्राउंड त्वरीत बंद करणेत यावेत अशी मागणी सर्व थरातून केली जात आहे.
रेवदंडा ग्रामपंचायतीची घंटा गाडी नित्याने सुरू आहे, मात्र काही ग्रामस्थ घंटा गाडीच्या सुविधेचा लाभ न घेता,बेपर्वाईने मुख्यःरस्तालगत केरकचरा व घाण टाकत आहेत,ही बाब रेवदंडा गावासाठी शरमेची बाब आहे, प्रत्येक ग्रामस्थांनी स्वतः स्वच्छतेसाठी योगदान देणे जरूरीचे आहे. येथील केरकचरा व घाण ग्रामपंचायतीचे वतीने लवकरच हटविण्यात येईल,परंतू ग्रामस्थांनी गावाच्या हितासाठी व स्वच्छतेसाठी मुख्यः रस्तालगत केरकचरा व घाण टाकू नये असे आवाहन सरपंच प्रफुल्लशेठ मोरे यांनी रेवदंडा ग्रामस्थांना केले आहे.