ताज्याघडामोडी

महाळुंगे विभाग कुणबी सामाजीक सभागृहाचा बोर्ली येथे शानदार उध्दाटन

समाज एकत्रीत ठेवून, एकोपा राखा-आमदार महेंद्र दळवी
साळाव ते आंगरदांडा रस्ता लवकरच, 30 कोटी रूपयांचा निधी
स्थानिकांना रोजदांरीसाठी उदयोग-व्यवसायासाठी प्रयत्नशील

रेवदंडा-महेंद्र खैरे- समाज एकत्रीत ठेवून,एकोपा राखा असे आवाहन महाळुंगे विभाग कुणबी सामाजीक सभागृहाच्या बोर्ली येथील उध्दाटन कार्यक्रम प्रसंगी अलिबाग-मुरूड विधानसभा आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी उपस्थित कुणबी समाज बांधव व भगिनीना संबोधीत करताना केले, यावेळी त्यांनी साळाव ते आगरदांडा काही दिवसांत सुस्थितीत असेल तसेच स्थानिकांच्या रोजदांरीसाठी उदयोग-व्यवसायासाठी निश्‍चित प्रयत्नशील असल्याचे ग्वाही त्यांनी दिली.

मुरूड तालुक्यातील बोर्ली येथे आमली,ताडगाव,महाळुंगे बु.,काकळघर, चिचंघर, कोर्लई या महाळुंगे विभाग कुणबी सामाजीक सभागृह आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या 22 लाख रूपये निधीच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आले आहे. या कुणबी सामाजीक सभागृहाचा उद‍्धाटन सोहळा कार्यक्रम मंगळवार दि.17 जानेवारी 2024 रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात आला. या कुणबी सामाजीक सभागृहाचा उद‍्धाटन सोहळा कार्यक्रमास प्रमुख पाहूणे व उद‍्धाटक म्हणून आमदार महेंद्र दळवी यांना निमंत्रीत करण्यात आले होते. तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतशेठ बेलोसे, अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी,मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, शिवसेना जेष्ठ कार्यकर्ते व कुणबी समाज नेते सि.एम. ठाकूर,विघ्नेश माळी, कुणबी समाज अध्यक्ष सुरेश ठाकूर,काकळघर ग्रा.प. सरपंच स्वस्तिक ठाकूर, रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्‍ल मोरे, बोर्ली ग्रा.प.सरपंच सपना जायपाटील,गोफण ग्रा.प. सरपंच मनिषा कडू,शैलेश चव्हाण, माणिक बळी, जनार्दन कमाने,मधुकर पाटील,युवा उपअधिकारी विकी वेगस,मांडळा ग्रा.प.माजी सरपंच सुचिता पालवणकर,काकळघर ग्रा.प. उपसरपंच सुरक्षा ठाकूर,काकळघर ग्रा.प. माजी सरपंच साक्षी ठाकूर, सतेज ठाकूर, राजू भोईर, माजी सभापती काळीताई ठाकूर,रा.कॉ.हरिश्‍चंद्र वाजंत्री,भारत मोती,दिपक कांबळी,रघुनाथ कांबळी,उपसरपंच अनंत चवरकर,तसेच कुणबी समाजाचे नंदकुमार जवरत,सुनिल ठाकूर,सुनिल केंद्रे, चंद्रकांत जाधव,सुभाष ठाकूर,मनोहर सकपाल,एकनाथ भोपी,किसन पाटील,नरेश वाघरे,योगेश मोरे,रमेश जाईलकर,कैलास पवार,नितिन आर्डे,महेंद्र साळवी,सिताराम सानप आदीसह मोठया संख्येने कुणबी समाज बांधव व भगिनी यांची उपस्थिती होती.

प्रांरभी आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे कार्यक्रम स्थळापर्यंत महाळुंगे विभाग कुणबी समाजाचे वतीने वाजतगाजत मिरवणूकीने आणण्यात आले. त्यानंतर कुणबी समाज भगिनीेने आमदार महेंद्र दळवी आणि इतर मान्यवराचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून तसेच मुख्यः दरवाजाची फित कापून महाळुंगे विभाग कुणबी सामाजीक सभागृहाचे उध्दाटन करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलन व कुणबी समाज भगिनीचे स्वागत गित गायनानंतर आमदार महेंद्र दळवी यांचा सत्कार व स्वागत शिवसेना जेष्ठ नेते व कुणबी समाजाचे पदाधिकारी सि.एम. ठाकूर व महाळुंगे विभाग अध्यक्ष सुरेश ठाकूर व कुणबी समाज सदस्यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह प्रदान करून केला.यावेळी उपस्थित इतर मान्यवर मंडळीचे स्वागत कुणबी समाजाचे वतीने पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक सुनिल केंद्रे यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र दळवी यांनी समाज एकत्रीत ठेवून,एकोपा राखा असे आवाहन कुणबी समाजाला केले. यावेळी मुरूड तालुक्याचा सर्वागिण विकास साधण्याचा निश्‍चित प्रयत्न करताना रस्ते,पाणी,लाईट सुविधेकडे विशेष लक्ष्य देवून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. यावेळी येथील स्थानिक युवावर्गाला नोकरी व रोजदांरीसाठी मुंबई,पुणे आदी शहराकडे जावे लागते, यांची खंत व्यक्‍त करून मुरूड तालुक्यात युवकांना रोजदांरी व नोकरी साठी उदयोग व व्यवसायासाठी निश्‍चित प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच साळाव व आगरदांडा रस्ता अत्यंत दुरावस्था झाली आहे, त्यांची दुरावस्थेसाठी कारणीभूत असलेल्या माजी आमदाराना येथील जनतेने जाब विचारला पाहिजे हे सांगून येत्या साळाव व आगरदांडा मुख्यः रस्त्यासाठी 30 कोटीचा निधी उपलब्ध झाला असून येत्या दिड महिन्यात साळाव ते आगरदांडा रस्ता सुस्थितीत असेल अशी त्यांनी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *