ताज्याघडामोडी

भोवाळे येथे शुध्द जल पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भोवाळे येथे शुध्द जल पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौल ग्रामपंचायत अंतर्ग भोवाळे येथे शुध्द जल पाणी पुरवठा योजनेचा (आरो प्लंट) भव्य शुभारंभ कार्यक्रम दत्‍त जयंतीच्या निमित्‍ताने करण्यात आला. यावेळी उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौल भोवाळे येथे चौल ग्रामपंचायतीचे वतीने शुध्द जल पाणी पुरवठा योजनेचा (आरो प्लंट) भव्य शुभारंभ कार्यक्रम दत्‍त जयंतीच्या निमित्‍ताने आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ध्दव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचे प्रमुख उपस्थितीसह चौल ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा पवार, ग्रा.प.उपसरपंच अजीत गुरव, ग्रा.प. सदस्य अजीत मिसाळ, ग्रा.प.सदस्या रूपाली म्हात्रे आदीसह भोवाळे ग्रामस्थ व महिला यांची मोठी उपस्थिती होती.
प्रारंभी सरपंच प्रतिभा पवार, रूपाली म्हात्रे व ग्रामस्थ महिला भोवाळे यांचे हस्ते पुजा अर्चा करण्यात आली, त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचे हस्ते फित कापून, श्रीफळ वाढवून व नळ पाणी पुरवठा शुभारंभ करण्यात आला.
चौल भोवाळे येथील नियोजीत शुध्द जल पाणीपुरवठा योजनेचा (आरो प्लंट) मधून भोवाळे ग्रामस्थ व महिलांना शुध्द जल पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे भोवाळे ग्रामस्थांची शुध्द पाण्याची समस्या दुर होण्यास मदत होणार आहे. चौल ग्रामपंचायतीचे वतीने चौल मध्ये अनेक लोकोपयोगी विकास कामे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण केली आहेत, असे उपसरपंच अजीत गुरव यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *