नागाव ग्रा.म.मध्ये एलपीजी गॅस-ई-केवायसी शिबीर

नागाव ग्रा.म.मध्ये एलपीजी गॅस-ई-केवायसी शिबीर
रेवदंडा-महेंद्र खैरे- सर्व एलपीजी गॅस धारकांना केवायसी करणे अनिवार्य असल्याने नागाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ एलपीजी गॅस कार्ड धारकांच्या सोयीसाठी एलपीजी गॅस-ई-केवायसी शिबीराचे आयोजन नागाव ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात आले होते.
नागाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात मंगळवार दि. 19 डिंसेबर 2023 रोजी सकाळी 10 ते 1.00 व दुपारी 2 ते 4 या वेळेदरम्यान एलपीजी गॅस-ई-केवायसी शिबीर संपन्न झाले, या एलपीजी गॅस-ई-केवायसी शिबीरास नागाव ग्रामस्थ एलपीजी गॅस कार्ड धारकांनी मोठया उत्साहानी प्रतिसाद दिला. सबसिडीसाठी केवायसी म्हणजेच एलपीजी गॅस कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे होय. यासाठी आधार कार्ड, गॅस कार्ड व पासबुक यासह नागाव ग्रामस्थांची उपस्थिती नागाव ग्रामपंचायत सभागृहता होती.
या शिबीरास एलपीगॅसचे कर्मचारीवर्ग तसेच नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा निखिल मयेकर, उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, ग्रा.प.सदस्य निखिल मयेकर, आदेश मोरे, सुरज म्हात्रे, रोहन नाईक, अनिरूध्द राणे, ग्रा.प.सदस्या मंगळा नागे, सुप्रिया म्हात्रे, प्रियंका काठे, निकिता पाडेकर, रोहिणी घरत, विणा पिंपळे, लीना म्हात्रे, अंकिता शेवडे आदीची उपस्थिती होती.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर व उपसरपंच ग्रा.प.सदस्य, सदस्या यांनी नागाव ग्रामस्थ एलपीजी कार्ड धारकांना विशेष सहकार्य दिले, तर एलपीजी गॅस कर्मचारीवर्ग व नागाव ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
