काकळघर मध्ये बाळासाहेबाची शिवसेनेचा शेकापक्षाला जोरदार धक्कामहाळुंगे व डाकेली मधील कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश- आम. महेंद्रशेठ दळवी यांनी केले स्वागत
काकळघर मध्ये बाळासाहेबाची शिवसेनेचा शेकापक्षाला जोरदार धक्का
महाळुंगे व डाकेली मधील कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश- आम. महेंद्रशेठ दळवी यांनी केले स्वागत
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यात बाळासाहेबाची शिवसेना पक्षाची जोरदार घौडदौड सुरू असून काकळघर ग्रामपंचायत हद्दीतील महाळुंगे व डाकेली येथील शेकापक्ष कार्यकर्त्यानी अलिबाग-मुरूड विधानसभा आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे मतदार संघात भरमसाठ विकास कामे व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवीत बाळासाहेबाची शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला.
अलिबाग नजीक राजमळा येथील आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे निवासस्थानी पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाळुंगे बुद्रूक व डाकेली येथील शेकापक्ष कार्यकर्ते व काकळघर ग्रा.प. माजी तंटा मुक्त समिती अध्यक्ष मंगेश जोगत, काकळघर ग्रा.प. माजी उपसरपंच निवेदिता मंगेश जोगत, संदेश जोगत, महेश जाधव,जोगेश वीर, सुभाष घडशी, राजेश घडशी, आदी असंख्य कार्यकर्त्यानी बाळासाहेबाची शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला, आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी त्यांचे स्वागत केले
आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी त्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी बाळासाहेबाची शिवसेना नेते सि.एम. ठाकूर, उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोसे, तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, उपतालुका प्रमुख मनोज कमाने, मुरूड तालुका संघटिका मंदाताई ठाकूर, प्रदीप धनावडे, विनोद पाडावे, काशिनाथ मोहिते, मधुकर पाटील, काकळघर ग्रा.प.सरपंच स्वस्तिक ठाकूर, माजी सरपंच सुरेश ठाकूर, गणेश ठाकूर, ग्रा.प.सदस्य निशांत दांडेकर, ग्रा.प.सदस्य सुदेश पाडावे, तसेच महाळुंगे व डाकेली ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
पक्ष प्रवेश कार्यकर्त्याचे स्वागत करताना, आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याचा मानसन्मान ठेवला जाईल, तसेच विविध विकास कामांची निश्चित पुर्तता केली जाईल असे मनोगत आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील यांनी केले.